Marathi News> भारत
Advertisement

राज्यपालांकरता अधिकाऱ्यांनी नियम मोडला, धबधब्याला सोडलं पाणी : VIDEO

अचानक पाणी सोडल्यामुळे नदीकाठी राहणारे लोक धोक्यात आले

राज्यपालांकरता अधिकाऱ्यांनी नियम मोडला, धबधब्याला सोडलं पाणी : VIDEO

मुंबई : अनेकदा अधिकारी आपल्या नियमांचा गैरवापर करताना दिसतात. असाच प्रकार कर्नाटकमध्ये घडला आहे. कर्नाटकच्या राज्यपालांना धबधबा पाहण्यासाठी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे. या प्रकरणाची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांना जोग फॉल्स धबधबा पाहायचा होता. याकरता कर्नाटक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (KPCL) ने लिंगनमक्की धरणातून सुमारे ५०० क्युसेक पाणी सोडले. महत्वाचे म्हणजे अधिकाऱ्यांनी यासाठी कोणाचीही परवानगी न घेतली नव्हती. त्यामुळे वाद निर्माण झाला आहे. राज्यपालांना व्हीआयपी वागणूक देता यावी यासाठी अधिकाऱ्यांनी हा प्रताप केला, असं म्हटल्याच जात आहे. 

कर्नाटकचे राज्यपाल राज्यपाल थावरचंद गहलोत हे शरावती नदीवर १५१ टीएमसी क्षमतेचे मोठे धरण पाहण्यासाठी आहे. या धरणाच्या जवळपास प्रसिद्ध ‘जोग फॉल्स’ हा धबधबा आहे. हा धबधबा पाहायला राज्यपाल जाणार होते. 

राज्यपालांना धबधबा वेगाने वाहतांना पाहता यावा यासाठी अधिकाऱ्यांनी मनमानी करत नदीकाठच्या लोकांना कुठलीही पूर्व कल्पना न देता राज्यपाल येण्यापूर्वी शरावती नदीमध्ये पाणी सोडले. मात्र, धबधब्यापर्यंत पाणी पोहोचण्यापूर्वीच राज्यपाल काही मनिटातच तेथून निघून गेले.

गुरुवारी केलाडी शिवप्पा नायक कृषी आणि फलोत्पादन विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सहभागी होण्यासाठी गहलोत बुधवारी शिवमोग्गा येथे गेले होते. जोग येथील इंस्पेक्शन बंगल्यात त्यांनी रात्रभर मुक्काम केला, ज्याला ब्रिटिश बंगला म्हटले जाते, जो फॉल्सच्या जवळ आहे.

दरम्यान, योग्य प्रक्रिया न करता पाणी सोडल्याबद्दल अधिकाऱ्यांची आता चौकशी करण्यात येत आहे. कारण अचानक पाणी सोडल्यामुळे नदीकाठी राहणारे लोक धोक्यात आले असते.

Read More