Marathi News> भारत
Advertisement

ऐकावं ते अजबच! बॉयफ्रेंड नाही, तर प्रवेश नाही; कॉलेजमधील नोटीसमुळं एकच खळबळ

Valentines Day 2023 : प्रेमाचा दिवस साजरा करण्यासाठी अनेकजण तयारीला लागले असतील. पण, महाविद्यालयांना काय झालंय? ती व्हायरल नोटीस पाहून डोकं चक्रावेल   

ऐकावं ते अजबच! बॉयफ्रेंड नाही, तर प्रवेश नाही; कॉलेजमधील नोटीसमुळं एकच खळबळ

Valentines Day 2023 : व्हॅलेंटाईन्स डे (Valentines Day ) जवळ आला आहे. त्यामुळं एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या अनेक प्रेमी युगूलांनी आपल्या हल्लाच्या जोडीदाराला काहीतरी खास भेट देण्याचा विचारही करण्यास सुरुवात केली आहे. यंदा हा दिवस कसा बरं साजरा करावा? हाच प्रश्न अनेकजण स्वत:ला विचारत आहेत. यातच एका महाविद्यालयानं विद्यार्थ्यांना उद्देशून दिलेल्या नोटिसनं अनेकांनाच धक्का दिला आहे. व्हॅलेंटाईन्स डे पर्यंत बॉयफ्रेंड शोधणं अनिवार्य आहे असं या नोटीसमध्ये स्पष्टपणे लिहिण्यात आलं आहे. बरं इतकंच नव्हे, तर विद्यार्थीनींनी प्रियकरासोबतच कॉलेजला यावं अन्यथा एकट्या विद्यार्थीनीना प्रवेश नाकारला जाईल अशी सूचनाच करण्यात आली. 

सोशल मीडियावर सध्या महाविद्यालयाकडून जारी करण्यात आलेली ही नोटीस प्रचंड व्हायरल होत आहे. महाविद्यालयापर्यंत जेव्हा ही माहिती पोहोचली तेव्हा मात्र यामागचं सत्य समोर आलं. तपासातून ही नोटीसच बनावट असल्याचं स्पष्ट झालं. (Odisha Fake notice asks college girls to must have boyfriends before valentine day complaint in Police)

व्हायरल नोटीसमध्ये काय म्हटलं गेलं? 

'14 फेब्रुवारीपर्यंत विद्यार्थिनींना किमान एक तरी बॉयफ्रेंड असणं अनिवार्य असेल. हे सुरक्षिततेच्या दृष्टीनं ठरवण्यात आलं आहे. एकट्या विद्यार्थिनीला महाविद्यालयीन परिसरात प्रवेश नाकारला जाईल. विद्यार्थीनींना त्यांच्या बॉयफ्रेंडसोबतचा हल्लीचा फोटो दाखवावा लागणार आहे. प्रेमाचा प्रसार करा...', असं त्या नोटीसमध्ये लिहिण्यात आलं होतं. वाचतानाच खटकतंय ना? 

हेसुद्धा वाचा : Republic Day 2023 : दाढीमिशा वाढवून दहशतवाद्यांमध्ये वावरत होता भारताचा 'रक्षक'; मृत्यूशी केलेली मैत्री 

उपलब्ध माहितीनुसार जगतसिंहपूर येथील एसवीएम ऑटोनॉमनस महाविद्यालयाच्या नावानं ही नोटीस व्हायरल झाली. ज्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी सुद्धा दिसत आहे. सदर प्रकरणाची अमाप चर्चा सुरु झाल्यानंतर लगेचच खुद्द मुख्याध्यापकांनी प्रतिक्रिया देत हे सर्वकाही खोटं असल्याचं सांगितलं. महाविद्यालयाच्या वतीनं विद्यार्थांना उद्देशून अशी कोणतीही सूचना करण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. 

fallbacks

सदरील लेटरहेड किंवा पत्रकावर देण्यात आलेला संपर्कासाठीचा दूरध्वनी क्रमांक महाविद्यालयाचा नाही यावर त्यांनी जोर दिला. विद्यार्थीनींनीसुद्धा हा व्हायरल मेसेज, ही नोटीस आपल्या महाविद्यालयाची नसल्याचं सांगत महाविद्यालयाची प्रतिमा मलिन करण्यासाठीचा हा कट असल्याचं म्हटलं. 

आता गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड नसेल तर कारवाई होणार? 

दरवर्षी व्हॅलेंटाईन्स डे जवळ आला की त्याभोवती फिरणाऱ्या अनेक अफवा, अनेक बातम्या समोर येतात. ही त्यातचील एक असावी असं अनेकांचं म्हणणं आहे. 2018 मध्येसुद्धा चंदीगढ विद्यापीठाच्या वतीनं असाच एक मेसेज व्हायरल झाला होता. जिथं गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड नसणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यापीठात प्रवेश नसेल, त्यांच्याकडून दंड आकारण्यात येईल असं लिहिण्यात आलं होतं. पण, तो मेसेजही तथ्यहीन होता हीच बाब तपासातून समोर आली होती. 

Read More