Marathi News> भारत
Advertisement

Upcomming IPO | पैसा ठेवा तयार; लवकरच लाखोंचा नफा मिळवून देणारे IPO येणार

गुंतवणूकदारांसाठी 2021 हे वर्ष जबरदस्त नफा देणारे ठरले आहे. आतापर्यंत 43 कंपन्या बाजारात लिस्ट झाल्या आहेत.

Upcomming IPO | पैसा ठेवा तयार; लवकरच लाखोंचा नफा मिळवून देणारे IPO  येणार

नवी दिल्ली : गुंतवणूकदारांसाठी 2021 हे वर्ष जबरदस्त नफा देणारे ठरले आहे. आतापर्यंत 43 कंपन्या बाजारात लिस्ट झाल्या आहेत. यामध्ये 75 टक्क्याहून अधिक पॉझिटिव रिटर्न मिळाले आहेत. 10 नवीन नवीन शेअर्सने गुंतवणूकदारांचा पैसा दुप्पट तिप्पट केला आहे. तुम्हालाही आय़पीओच्या माध्यमातून पैसा गुंतवण्याची इच्छा असेल तर चांगली संधी आहे. मार्केट रेग्युलेटर (SEBI)ने आणखी काही कंपन्यांना IPO आणण्यासाठी मंजूरी दिली आहे. यामध्ये राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेली कंपनी Star Health Insurance, ई कॉमर्स ब्रॅंड  Nykaa सुद्धा सामिल आहे. यामध्ये काही कंपन्या आपला इश्यु लवकरच आणू शकते. जाणून घेऊया कोणत्या कंपनीचे आयपीओबाबत काय आहे नियोजन?

Star Health and Allied Insurance
राकेश झुनझुनवाला यांची गुंतवणूक असलेल्या Star Health ने आपल्या आयपीओच्या माध्यमातून 2000 कोटी रुपये उभारण्याचे नियोजन आहे. यामध्ये फ्रेश इक्विटी शेअऱ जारी करण्यात येणार आहेत. झुनझुनवालांची या कंपनीत 14 टक्के हिस्सेदारी आहे.

Nykaa
ई कॉमर्स ब्रॅंड Nykaa चा आयपीओच्या माध्यमातून 3500 कोटीहून अधिक रक्कम उभारण्याचे नियोजन आहे. सेबीने कंपनीच्या इश्युला मंजूरी दिली आहे. यामध्ये फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करण्याऐवजी OFS देखील असणार आहे.

Latent View Analytics
डाटा ऍनालिटिक्स सर्विस प्रोवाइडर Latent View Analytics आयपीओची साईज 600 कोटींची असणार आहे. आयपीओ अंतर्गत 474 कोटींचे नवीन शेअर जारी होणार आहेत. तसेच 126 कोटी रुपयांचे OFC असणार आहे.

Sigachi Industries
सिंगाची इंडस्ट्रीज आय़पीओच्या अंतर्गत 75.95 लाख इक्विटी शेअरची विक्री करण्यात येणार आहे. कंपनी औषधी प्रोडक्टची निर्माता आहे.

Read More