Marathi News> भारत
Advertisement

Gov Job | सरकारी नोकरीसाठी येथे अर्ज करा; 1 लाखापर्यंत पगाराची संधी

NTPC मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे.

Gov Job | सरकारी नोकरीसाठी येथे अर्ज करा; 1 लाखापर्यंत पगाराची संधी

मुंबई : सरकारी सार्वजनिक कंपनी (PSU)मध्ये नोकरी करण्याची संधी आली आहे. NTPCने अभियांत्रिकी पदासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. ही भरती फक्त महिला स्नातक अभियंत्यांसाठी आहे. उमेदवारांनी  NTPC च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येणार आहे.

(NTPC Recruitment 2021)  

NTPCमध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. उमेदवारांना या लिंकवर (https://www.ntpc.co.in/) क्लिक करून अर्ज करता येणार आहे. 

संकेतस्थळावर दिलेले अधिकृत नोटिफिकेशन पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा (https://www.ntpccareers.net/)

NTPCमधील भरतीमध्ये इलेक्ट्रिकल, मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि इंन्स्ट्रुमेंटेशन डिसिप्लीनच्या एकूण 50 जागा आहेत.

अर्ज करण्याची तारीख - 16 एप्रिल 2021 पासून

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 6 मे 2021

शैक्षणिक पात्रता - B.E/ B.Tech

वयाची अट - 21 ते 27 वर्षे

वेतन - 40 हजार ते 1 लाख 40 हजारापर्यंत (पदांनुसार)

Read More