Marathi News> भारत
Advertisement

काँग्रेसला मोठा झटका, मेघालयमध्ये एनपीपीसोबत भाजप सरकार स्थापन करणार

मेघालय विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कुणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मेघालयमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.

काँग्रेसला मोठा झटका, मेघालयमध्ये एनपीपीसोबत भाजप सरकार स्थापन करणार

नवी दिल्ली : मेघालय विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर कुणाची सत्ता स्थापन होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मेघालयमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.

भाजपचं समर्थन असलेलं सरकार

अवघ्या दोन जागा मिळवणाऱ्या भारतीय जनता पक्षाने एनपीपीला सोबत घेत आपला डाव साधण्यात यश आलं आहे. त्यामुळे मेघालयमध्ये भाजपचं समर्थन असलेलं सरकार स्थापन होणार हे स्पष्ट आहे.

मेघालयमध्ये भाजप, एनपीपी आणि यूडीपीच्या नेत्यांनी राज्यपाल गंगा प्रसाद यांची भेट घेतली होती. या भेटीत सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला होता. त्यांनी ३४ आमदारांचं समर्थन असल्याचा दावाही केला.

सर्वाधिक जागा मिळवल्या तरी...

६० जागा असलेल्या मेघालय विधानसभेत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक जागा मिळवल्या. मात्र, असे असलं तरी काँग्रेसला सत्तेपासून दूर रहावं लागत आहे.

अवघ्या दोन जागा मिळवल्या तरी सत्ता सत्तेत

मेघालयमध्ये सत्ता स्थापन करण्यासाठी मॅजिक फिगर ३० हवी होती. त्या प्रमाणे एनपीपी (१९ जागा), भाजप (२ जागा), यूडीपी (६ जागा), एचएसपीडीपी (२ जागा), पीडीएफ (४ जागा) आणि एक अपक्ष अशी मिळून सत्ता स्थापन होत आहे.

६ मार्च रोजी शपथविधी सोहळा

एनपीपी नेते कोनराड संगमा हे ६ मार्च रोजी सकाळी १० वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

Read More