Marathi News> भारत
Advertisement

'टाटा मीठ' आता टाटा केमिकल्स नाही, तर ही कंपनी विकणार

टाटा केमिकल्स ग्राहक उत्पादन व्यवसायामध्ये मीठ, मसाले आणि प्रोटीन युक्त खाद्य पदार्थ यांचा समावेश आहे. 

'टाटा मीठ' आता टाटा केमिकल्स नाही, तर ही कंपनी विकणार

मुंबई : टाटा केमिक्लस लिमिटेडने बुधवारी सांगितले की, टाटा आपल्या ग्राहक व्यवसायाला वेगळं करणार आहे आणि अशा व्यवसायांचं ते टाटा ग्लोबल बेवरेजेजमध्ये विलीन करणार आहेत. टाटा केमिकल्स ग्राहक उत्पादन व्यवसायामध्ये मीठ, मसाले आणि प्रोटीन युक्त खाद्य पदार्थ यांचा समावेश आहे. या विलयमध्ये टाटा केमिकल्स लिमिटेडच्या प्रत्येक शेअर धारकाला एका शेअरच्या बदल्यात टाटा बेवरेजेजचे १.१४ नवीन इक्विटी शेअर मिळतील. याचा अर्थ टीसीएलच्या १०० शेअरच्या बदल्यात टीजीबीएलचे ११४ शेअर मिळतील.

कंपनीने शेअर बाजाराला सांगितले की प्रस्तावित लेनदेननुसार ग्राहक व्यवसाय केंद्रात कंपनी तयार होईल. ज्याचा एकूण व्यवसाय ९ हजार ०९९ कोटी रुपये आणि कर, व्याज, मूल्यमापन आणि कर्जाची परतफेड करण्यापूर्वी आय (एबिडेटा) १ हजार १५४ कोटी रुपये असेल.

टाटा केमिकल्सने बीएसईला सांगितले, 'टाटा ग्लोबल बेवरेजेज लिमिटेड (TGBL) आणि टाटा केमिकल्स लिमिटेड (TCL), दोन्ही कंपन्यांची आज बैठक झाली, आणि त्यात टीसीएलचे ग्राहक उत्पादने टीजीबीएलमध्ये विलीन करण्यासाठी एकमत झालं. दोन्ही बोर्डांनी विलीनीकरणाविषयी स्वतंञ मूल्यांकनकर्ताच्या सल्ल्यावर हा निर्णय दिला.

टाटासन्सचे चेअरमन एन चंद्रशेखर म्हणाले, टाटा ग्राहक प्रॉडक्टस खाद्य आणि पेय सेगमेंटमध्ये आमचे अस्तित्व मजबूत होणार आहे. या विलीनीकरणाव्दारे आम्ही भारतीय ग्राहकांच्या वाढणाऱ्या आकाक्षांना पूर्ण करण्यासाठी चांगला प्लॅटफॉम तयार केला आहे.

Read More