Marathi News> भारत
Advertisement

आता मॉलमध्येही दारूविक्रीची तयारी, या राज्य सरकारचा निर्णय

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे मॉल आणि दारूची दुकानं बंद आहेत.

आता मॉलमध्येही दारूविक्रीची तयारी, या राज्य सरकारचा निर्णय

लखनऊ : कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे मॉल आणि दारूची दुकानं बंद आहेत. दारूविक्री बंद असल्यामुळे राज्य सरकारांचा महसूल मोठ्या प्रमाणावर आटला आहे. आता हा महसूल वाढवण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने मॉलमध्ये दारूविक्री करायला परवानगी दिली आहे. त्यामुळे आता उत्तर प्रदेशच्या शॉपिंग मॉल्समध्ये दारू आणि बियर विकता येणार आहे.

मॉलमध्ये दारूविक्री करण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारकडून लायसन्स देण्यात येणार आहे. पण सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उत्तर प्रदेशमधले शॉपिंग मॉल्स ३१ मेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. 

'उत्तर प्रदेशमध्ये फक्त एकल दुकानांमध्ये दारूविक्री होत होती, पण राज्य मंत्रिमंडळाने नियमांमध्ये बदल केल्यामुळे आता मॉलमध्येही दारूविक्री शक्य होईल. ही दुकानं सध्याच्या दुकानांपेक्षा अधिकची असतील. मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांची मोठी संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे,' असं उत्तर प्रदेशच्या महसूल विभागाचे मुख्य सचिव संजय आर. भुसरेड्डी यांनी सांगितलं. 

'कोणतीही कंपनी, व्यक्ती किंवा फर्म अथवा सोसायटी लायसन्ससाठी अर्ज करू शकतात. मॉलमध्ये दारूविक्री करण्यासाठी या मॉलचं क्षेत्रफळ १० हजार वर्ग फूट असावं. या मॉलमध्ये डिपार्टमेंटल स्टोर्स, सुपर मार्केट किंवा हायब्रिड हायपर मार्केट असणं बंधनकारक आहे. दारूचं दुकान उघडण्यासाठी कमीतकमी ५०० वर्ग फुटाचा कॉर्पोरेट भाग असला पाहिजे. ग्राहकांना त्यांचा आवडता ब्रॅण्ड पसंत करता आला पाहिजे, यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रॅण्डच्या दारू दुकानात असल्या पाहिजेत,' असं भुसरेड्डी म्हणाले. 

Read More