Marathi News> भारत
Advertisement

सर्वसामान्यांना इंधन दरवाढीतून दिलासा मिळण्याची शक्यता; गडकरींच्या ऑटो कंपन्यांना या महत्वपूर्ण सूचना

 पर्यायी इंधनासाठी एथेनॉलचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे.

सर्वसामान्यांना इंधन दरवाढीतून दिलासा मिळण्याची शक्यता; गडकरींच्या ऑटो कंपन्यांना या महत्वपूर्ण सूचना

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी मंगळवारी म्हटले की, भारत सरकार पुढील सहा महिन्यात ऑटो निर्मात्या कंपन्यांसाठी 100 टक्के जैव इंधनावर चालणारी वाहने सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकार जैव इधन वाहनांची निर्मिती आवश्यक करण्याचा निर्णय घेऊ शकते. यामुळे पेट्रोल-डिझेलच्या इंधन दरवाढीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळू शकतो. (Biofuel vehicles in India)

1 लीटर बायोएथेनॉलची किंमत
समोर आलेल्या वृत्तानुसार, नितिन गडकरी यांनी म्हटले की, 1 लीटर बायोएथेनॉलची किंमत 65 रुपये आहे. तसेच सध्या पेट्रोलच्या किंमती 110 रुपयांवर पोहचल्या आहेत. त्यामुळे पर्यायी इंधनासाठी एथेनॉलचा वापर वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे परकीय चलनाचीसुद्धा बचत होते.

इलेस्टिक इंजिनचा विचार
गडकरी यांनी म्हटले की, आम्ही निर्णय घेतला आहे की, आम्ही इलेस्टिक इंजिन (elastic-engine) हळु हळु आवश्यक असल्याचे निर्णय घेऊ. पुढील सहा महिन्यात आम्ही इलेस्टिक इंजिन आवश्यक असल्याचे आदेश देऊ. केंद्रीय मंत्र्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल कंपन्यांना याआधीच पेट्रोल आणि डिझेल विक्री केंद्रावर जैव - इंधनाच्या विक्रीचे आदेश देण्यात आले आहेत.

ग्राहकांकडे पेट्रोल आणि बायोफ्युअल यांमध्ये निवड करण्याचे पर्याय असतील.  तांदुळ, मक्का, साखर आदीसारख्या पिकांच्या सरप्लस उत्पादनांतून बायोएथेनॉलची निर्मिती केली जाते. गडकरी यांनी म्हटले की, देशात इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती गतीने सुरू आहे. अंदाजानुसार एका वर्षात देशातील रस्त्यांवर इलेक्ट्रिक वाहनांची लक्षणीय संख्या दिसणार आहे.

Read More