Marathi News> भारत
Advertisement

प्रवास करतानाच बँक खात्यातून कापले जाणार पैसे, Highway नं जाताय? ही बातमी तुमच्यासाठी

नेमकं काय होणार? पाहा... 

प्रवास करतानाच बँक खात्यातून कापले जाणार पैसे, Highway नं जाताय?  ही बातमी तुमच्यासाठी

मुंबई : भारत सरकारकडून देशातील राष्ट्रीय महामाग्रांवरील टोल बूथ हटवून त्याजागी स्वयंचलित नंबर प्लेट रीडर कॅमेरे लावण्याची योजना अंमलात आणण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत टोलऐवजी लावण्यात आलेले कॅमेरे वाहनाचा क्रमांक स्कॅन करून त्या वाहनाच्या क्रमांकाशी लिंक असणाऱ्या वाहन धारकाच्या खात्यातूनच पैसे कापले जाणार आहेत. रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी या योजनेवर काम सुरु असल्याचं वक्तव्य केलं. (Nitin Gadkari National Highway toll plaza road camera )

माध्यमांशी संवाद साधताना एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली. '2019 मध्ये आम्ही एक नियम केला, की कारला कंपनीकडूनच नंबर प्लेट देण्यात येईल. मागील चार वर्षांमध्ये जी वाहनं बाहेर आली, त्यांच्यावर विविध नंबर प्लेट पाहता येऊ शकतात. आता महामार्गांवरील टोल हटवून त्याऐवजी कॅमेरे लावण्याची योजना हाती घेण्याचा मानस आहे', असं ते म्हणाले. (Nitin Gadkari)

वाहन चालवतानाच टोलवरून गेल्यानंतर कशा प्रकारे खात्यातून पैसे कापले जातील याबाबतची माहिती गडकरी यांनी दिली. (Toll Plaza)

fallbacks

अधिक वाचा : अनिल अंबानी यांच्या अडचणीत वाढ; 420 कोटींच्या करचुकवेगिरीचा आरोप

टोल बूथसंदर्भातील काही कायदेशी तरतुदी पूर्ण करण्यासोबतच ज्या वाहनांवर अधिकृत नंबर प्लेट नाही, त्यांना ठराविक कालावधी पूर्ण होण्यापूर्वी हे काम करुन घेण्यासाठीची व्यवस्था करावी लागणार आहे ही बाब अधोरेखित करत यासाठी एका विधेयकाची गरज असेल असंही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केलं. 

Read More