Marathi News> भारत
Advertisement

नीता अंबानींच्या या बॅगची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो...

नीता अंबानी नुकत्याच अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांच्यासोबत दिसल्या

नीता अंबानींच्या या बॅगची किंमत ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो...

मुंबई : 'बिझनेस वुमन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नीता अंबानी अनेकदा चर्चेत असतात... पण, आज मात्र त्यांच्याहून जास्त चर्चा होतेय ती त्यांच्या हातातल्या पर्सची... आता तुम्ही म्हणाल पर्सचं काय एवढं? पण, या पर्सची किंमत ऐकली तर अनेकांना धक्का बसू शकतो. नीता अंबानी या त्यांच्या स्टाईलसाठी आणि ड्रेसिंग सेन्ससाठीही प्रसिद्ध आहेत. त्यांची महागडी स्टाईल अनेकांना आपल्याकडे आकर्षित करते. आता तुम्हाला या फोटोमध्ये त्यांच्या हातात जी पर्स दिसतेय ती अगदी साधी दिसत असली तरी त्याची किंमत मात्र कोट्यवधींच्या घरात आहे. 

नीता अंबानी नुकत्याच अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांच्यासोबत दिसल्या. त्यांचा हा फोटो सोशल मीडियातून त्यांच्या चाहत्यांसमोर आला... आणि इथूनच सुरुवात झाली नीता अंबानींच्या पर्सच्या चर्चेला... 

View this post on Instagram

Wonderful afternoon #londondiaries

A post shared by KK (@therealkarismakapoor) on

रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन असलेल्या नीता अंबानी यांची ही साधी-सुधी दिसणारी बॅग २.६ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची आहे. 'हिमालया बिर्किन बॅग' या ब्रॅन्डच्या या बॅगवर २०० हिरे जडलेले आहेत. नीता अंबानींची ही हिरेजडीत बॅग सोशल मीडियावर व्हायरल झालीय. 

हा फोटो नीता अंबानी यांच्या लंडन दौऱ्याचा आहे. पाकिस्तान विरुद्ध भारत मॅचमध्ये टीम इंडियाला चीअर करण्यासाठी नीता अंबानी लंडनमध्ये दाखल झाल्या होत्या. यावेळी त्यांनी करीना आणि करिश्मा या कपूर बहिणींचीही भेट घेतली. हा फोटो करिश्मा कपूर हिनं आपल्या इन्स्टाग्राम वॉलवर शेअर केला होता. 

Read More