Marathi News> भारत
Advertisement

नवविवाहित मुलीची किंचाळी ऐकून आईने घेतली धाव, खिडकीतून वाकून पाहिलं तर पतीसह जमिनीवर....

Crime News: लग्नाच्या रिसेप्शनच्या काही मिनिटं आधी रुममध्ये पती-पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह (Dead Body) सापडल्याने खळबळ माजली आहे. मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकल्यानंतर आईने धाव घेतली असता दरवाजा आतून लॉक होता. मात्र नंतर त्यांचे मृतदेह सापडल्यानंतर सर्वांना धक्का बसला.  

नवविवाहित मुलीची किंचाळी ऐकून आईने घेतली धाव, खिडकीतून वाकून पाहिलं तर पतीसह जमिनीवर....

Crime News: छत्तीसगडच्या (Chhattisgarh) रायपूरमध्ये (Raipur) नवविवाहित दांपत्याचा मृतदेह (Dead Body) सापडल्यानंतर खळबळ माजली आहे. धक्कादायक बाब म्हणजे लग्नानंतर सर्वजण रिसेप्शनसाठी वाट पाहत असतानाच हे मृतदेह सापडले असल्याने एकच गोंधळ उडाला होता. दोघांच्या शरिरावर वार केल्याच्या खुणा असल्याने संशय निर्माण झाला होता. दरम्यान पोलिसांना दोघांमधील भांडणातूनच हा प्रकार झाला असावा अशी शंका आहे. 

मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोघांमध्ये भांडण झाल्यानंतर पतीने पत्नीची हत्या केल्यानंतर आत्महत्या केली असावी असा पोलिसांचा संशय आहे. 

नेमकं काय घडलं?

24 वर्षीय अस्लम आणि कहकशा बानो यांचं रविवारी लग्न पार पडलं. मंगळवारी रात्री त्यांचं रिसेप्शन आयोजित करण्यात आलं होतं. आपल्या रुममध्ये दोघंही रिसेप्शनसाठी तयारी करत होते. यावेळी नवरीमुलीच्या आईने तिचा ओरडण्याचा आवाज ऐकला. यानंतर त्यांनी तात्काळ रुमच्या दिशेने धाव घेतली. 

रुम आतमधून लॉक होती आणि आवाज देऊनही दरवाजा उघडला जात नव्हता. यानंतर कुटुंबातील सदस्यांनी खिडकीतून आत वाकून पाहण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघंही रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले असल्याचं त्यांना दिसलं आणि धक्काच बसला. त्यांनी तात्काळ पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली.

घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी दरवाजा तोडला. पोलिसांनी तात्काळ मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले. दोघांच्या शरिरावर भोसकल्याच्या खुणा आहेत. पोलिसांनी घटनास्थळी एक चाकूही सापडला आहे.

पोलिसांनी सांगितलं आहे की "प्राथमिकदृष्ट्या दोघांमध्ये वाद झाल आणि पतीने पत्नीवर चाकूने वार करत हत्या केली, नंतर स्वत: आत्महत्या केली असं दिसत आहे". मात्र यामध्ये अजून काही दडलं आहे का याची शोध पोलीस घेत आहेत. 

Read More