Marathi News> भारत
Advertisement

कॅब चालक तुमची राईड Cancel करतोय का? यापुढे असं नाही होणार

चालकाची डोकेदुखी वाढवणार हा नवा नियम 

कॅब चालक तुमची राईड Cancel करतोय का? यापुढे असं नाही होणार

मुंबई : गर्दी, गोंधळ, गडबडीच्या या वातावरणामध्ये सुखकर प्रवास होण्यासाठी कॅबनं जाण्याचा पर्याय निवडणारे आज अनेकजण आहेत. वेळ लागला तरी चालेल पण, प्रवास निवांत हवा, असंही म्हणणारे आणि कॅबनं प्रवास करणारे कमी नाहीत. पण, या प्रवासातही मनस्ताप चुकलेला नसतो. (ola uber cab ride)

कारण, कॅब बुक केल्यानंतर कुठे जाणार असं विचारण्यासाठी म्हणून चालक तुम्हाला फोन करतो आणि आपलं ठिकाण कळताच काही वेळानं Your Ride is Cancelled by driver असा मेसेज तुमच्यावर धडकतो. 

सहसा 5 ते 7 किलोमीटर अंतराच्या राईडची माहिती मिळताच चालक राईड नाकारत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालं आहे. ज्यामुळं सहाजिकच आशेवर असणारे आपण फारच निराश होतो. 

पण, यापुढे मात्र हे असं होणार नाही. कारण, एखाद्या चालकानं त्याच्या बाजुने राईड कॅन्सल केल्यास त्याची किंमत चालकालाच फेडावी लागणार आहे. 

हा नियम तूर्तास पश्चिम बंगालमध्ये लागू असला तरीही आता तो तुमच्या शहरातही लागू होण्यास फार वेळ दवडला जाणार नसल्याचं चित्र दिसत आहे. 

काय आहे नवा नियम? 
या नियमाअंतर्गत एक नवी सूचना लागू करण्यात आली आहे. राज्य शासनानं या सूचनेअंतर्गत कॅब चालकांद्वारा भाडं वसूल करण्यासाठी आणि राईड रद्द करण्यासाठी मोठा दंड आणि परवाना रद्द करण्यासाची तरतूद करण्यात आली आहे. 

एकच चालक वारंवार राईड कँसल करत असल्यास त्याच्यावर परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते. 

10 टक्के दंड आणि 6 महिन्यांसाठी परवाना रद्द... 
कॅब अॅग्रिगेटरला मूळ भाड्याहून कमी किंवा जास्त पैसे आकारण्याची परवानगी नसते. शिवाय डेड मायलेजचं शुल्कसुद्धा प्रवाशांकडून आकारता येत नाही. 

प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेनुसार कॅब चालक 3 किमी अंतराहून कमी असणाऱ्या प्रवासासाठी ठरलेल्या रकमेहून वेगळी रक्कम आकारू शकत नाही.

चालकाच्या बाजुनं राईड रद्द झाल्यास त्याला 100 रुपयांच्या राईडवर 10 टक्के रक्कमेचा दंड आकारला जाणार आहे. शिवाय 10 दिवसांपासून 6 महिन्यांपर्यंतच्या काळासाठी त्याचा परवानाही रद्द केला जाऊ शकतो. 

Read More