Marathi News> भारत
Advertisement

नेस्लेची ऑफर : मॅगीच्या 10 रॅपरच्या बदल्यात मिळणार 1 मॅगी फ्री

या माध्यमातून ग्राहकांना फ्री मॅगी पॅकेट मिळणार आहे.

नेस्लेची ऑफर : मॅगीच्या 10 रॅपरच्या बदल्यात मिळणार 1 मॅगी फ्री

मुंबई : देशातील सर्वात मोठी फूड कंपनी असलेल्या नेस्ले इंडियाने 'प्लास्टिक बंदी' ची घोषणा गांभीर्याने घेतली आहे. यामध्यमातून मॅगच्या रॅपरवरील प्लास्टिकचा पुनरवापर करण्यात येणार आहे. यासाठी कंपनीतर्फे 'MAGGI Wrappers return'कार्यक्रम राबवला जाणार आहे. या माध्यमातून ग्राहकांना फ्री मॅगी पॅकेट मिळणार आहे. या ऑफरनुसार, मॅगी नुडल्सच्या प्रत्येक दहा रॅपरच्या बदल्यात तुम्हाला एक मॅगी पॅकेट मिळणार आहे.

आम्ही प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे नेस्ले इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले. 'सध्या नेस्ले इंडियातर्फे 250 विक्रेत्यांसोबत हा कार्यक्रम राबविला जातोयं. यामुळे ग्राहकांच्या प्लास्टिक टाकून देण्याच्या वर्तनात बदल होईल असं नेस्लेचं म्हणणं आहे.

प्लास्टिक कचऱ्यात वाढ 

उत्तराखंड सारख्या टेकडी प्रदेश भागामध्ये प्लास्टिक कचरा व्यवस्थापन करणे कठीण होतं. इथे जमा होणाऱ्या कचऱ्यामध्ये मॅगीसह पारलेच्या फ्रूटी आणि पेप्सिकोच्या लेस चिप्स अशा टॉप ब्रॅण्ड्सच्या पदार्थांचे रॅपर्स जास्त असतात.

यामुळे प्लास्टिक प्रदूषणात वाढ होत असल्याचे गती फाऊंडेशनने मे मध्ये केलेल्या संशोधनात समोर आलंय.

मुसोरीमध्ये मॅगीच्या रॅपर्सचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही यामध्ये म्हटलंय.

दहा रॅपरवर एक मॅगी फ्री हा प्लान सध्या देहरादून आणि मुसोरीमध्ये हा कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर सुरू आहे.

यामध्ये येणाऱ्या यशा-अपयशावर पुढील कोणत्या राज्यात प्लान राबवायचा हे ठरवण्यात येणार आहे. 

Read More