Marathi News> भारत
Advertisement

कुख्यात गुंड म्हणून त्याला अटक, पण तो तर निघाला राष्ट्रीय कबड्डीपटू, पहा कोण आहे तो?

या कुख्यात गुंडाने 2021 मध्ये आपल्या पत्नीची हत्या केली होती. त्यांनतर तो पसार झाला होता. त्यामुळे हरियाणा पोलिसांनी त्याच्यावर ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.  

कुख्यात गुंड म्हणून त्याला अटक, पण तो तर निघाला राष्ट्रीय कबड्डीपटू, पहा कोण आहे तो?

नवी दिल्ली : पोलिसांच्या स्पेशल टीमने एका आंतरराज्यीय कुख्यात गुंडाला अटक केली. त्याच्याकडून १ पिस्तूल आणि चार जिवंत काडतूस जप्त केली. त्याची अधिक चौकशी केली असता तो गुंड चक्क राष्ट्रीय कबड्डीपटू ( Nationl Kabaddi Player ) निघाला.

स्पेशल टीमचे डीसीपी राजीव रंजन यांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या या कुख्यात गुंडाने 2021 मध्ये आपल्या पत्नीची हत्या केली होती. त्यांनतर तो पसार झाला होता. त्यामुळे हरियाणा पोलिसांनी त्याच्यावर ५० हजारांचे बक्षीस जाहीर केले होते.

दरम्यानच्या काळात तो आंतरराज्यीय कुख्यात गुंड कौशल आणि नवीन बाली यांच्या टोळीच्या संपर्कात आला. तुरुंगातून आदेश मिळताच तो गुन्हेगारी कारवाया करत असे. 

उत्तर प्रदेश ( Uttar Pradesh ) आणि हरियाणामध्ये ( Hariyan ) खून, खुनाचा प्रयत्न आणि दरोड्याच्या अनेक गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग होता. उत्तर प्रदेशच्या स्पेशल टीमला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दिलीत सापळा रचला आणि त्याला अटक केली. सद्य:स्थितीत त्याला शस्त्रास्त्र कायद्याच्या कलमाखाली अटक करण्यात आली आहे. 

दिनेश धिल्लू ( Dinesh dhillu ) असे या आंतरराज्यीय कुख्यात गुंडाचे नाव असून तो हरियाणातील गोहाना, सोनीपत येथील रहिवासी आहे. त्याच्याकडून एक पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे पोलिसांच्या चौकशीत दिनेश हा राष्ट्रीय कबड्डीपटू असल्याची माहिती समोर आलीय.

Read More