Marathi News> भारत
Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आईची भेट घेणार

सोमवारी पंतप्रधान मोदी वाराणसी पोहचणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आईची भेट घेणार

नवी दिल्ली : आज नरेंद्र मोदी अहमदाबाद येथे आईचा आशीर्वाद घेण्यासाठी जाणार आहेत. गुजरात भाजपाच्या अभिनंदनपर कार्यक्रमात ते सहभागी होतील. गुजरात भाजपाच्या या कार्यक्रमात मोदी आणि शाह सहभागी होणार आहेत. मोदी आज संध्याकाळी ५ वाजता अहमदाबाद विमानतळावर दाखल होणार आहेत.

विमानतळावर पोहचल्यानंतर तिथून ते थेट खानपूर इथल्या पक्ष कार्यालयात जातील. तिथे कार्यकर्ते मोदी, शाहांचं स्वागत करणार आहेत. खानपूरमध्ये मोदींची एक सभा होणार आहे. सभा झाल्यावर आईचे आशीर्वाद घेण्यासाठी निवासस्थानी दाखल होणार आहेत. 

पंतप्रधान मोदींनी ट्विट करत त्यांच्या दौऱ्याबाबत माहिती दिली आहे. सोमवारी पंतप्रधान मोदी वाराणसी पोहचणार आहेत. संपूर्ण जनतेने दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी महान भूमिवरील लोकांचे आभार मानण्यासाठी सोमवारी काशीमध्ये दाखल होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Read More