Marathi News> भारत
Advertisement

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला महाराष्ट्र तसेच देश-विदेशातून कोण राहणार उपस्थित? दिल्लीत कशी सुरु आहे तयारी?

Narendra Modi Shapath Grahan: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. 

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला महाराष्ट्र तसेच देश-विदेशातून कोण राहणार उपस्थित? दिल्लीत कशी सुरु आहे तयारी?

Narendra Modi Shapath Grahan: नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशाच्या जनतेने एनडीएला बहुमत दिले आहे. यानंतर एनडीएचे नेते नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. आज संध्याकाळी 7.15 वाजता ते राष्ट्रपती भवनात पंतप्रधान पदाची शपथ घेतील. या भव्य अशा शपथविधी सोहळ्याची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. सोहळ्यासाठी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणाची भव्य सजावट करण्यात आली आहे. प्रांगणात एक खास स्टेज तयार करण्यात आला आहे, येथे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. या सोहळ्याला कोण कोण उपस्थित राहणार? याबद्दल जाणून घेऊया. 

पंतप्रधान मोदींच्या शपथविधी सोहळ्यासाठी ऐतिहासिक अशी राष्ट्रपती भवनाची इमारत खास रंगीबेरंगी दिव्यांनी सजवण्यात आली आहे. कॉम्प्लेक्स विशेष फुले आणि शोभेच्या झाडांनी सजवलाय. विशेष पाहुण्यांच्या स्वागतासाठी रेड कार्पेटही अंथरण्यात आले आहेत.

देशविदेशातील नेत्यांसह 8 हजार पाहुणे

या ऐतिहासिक सोहळ्यात सुमारे 8 हजार पाहुणे सहभागी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 2014 आणि 2019 मध्येही नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात एका भव्य कार्यक्रमात पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी भारत आणि हिंदी महासागर क्षेत्रातील अनेक शेजारी देशांच्या नेत्यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.  विविध देशातील दोन राष्ट्रपती, एक उपराष्ट्रपती आणि 4 पंतप्रधानांची मोदींच्या शपथविधीला उपस्थित राहणार आहेत.

श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, मालदीवचे राष्ट्रपती डॉ. मोहम्मद मुइज्जू, सेशेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद कुमार जुगनाथ. , नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल 'प्रचंड' आणि भूतानचे पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे. पंतप्रधान कार्यालयाने शुक्रवारी यासंदर्भात माहिती दिली. दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसदेखील या सोहळ्याला उपस्थित असतील. एनडीएचे महत्वाचे सर्व नेत्यांना या सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. 

बांगलादेशच्या पंतप्रधान पोहोचल्या

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या शपथविधी सोहळ्यासाठी शुक्रवारी दिल्लीत पोहोचल्या. शपथविधी समारंभानंतर त्याच दिवशी संध्याकाळी राष्ट्रपती भवनात द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवानीलाही हे पाहुणे उपस्थित राहतील.

मान्यवरांना आमंत्रण

विशेष पाहुण्यांमध्ये चेन्नई विभागाच्या वरिष्ठ सहायक लोको पायलट, ज्या वंदे भारत गाड्यांवर काम करतात अशा ऐश्वर्या एस मेनन यांना शपथविधीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. ऐश्वर्या मेनन यांनी वंदे भारत एक्स्प्रेस आणि जनशताब्दी यांसारख्या प्रतिष्ठित गाड्यांमध्ये 2 लाखांहून अधिक फूटप्लेट तास चालवण्याची उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

याशिवाय सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पात काम करणारे काही मजूर तसेच ट्रान्सजेंडर, स्वच्छता कामगार, केंद्र सरकारच्या योजनांचे लाभार्थी आणि विकसित भारताचे राजदूत यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

Read More