Marathi News> भारत
Advertisement

एअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआयला मोदी सरकारची मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं बुधवारी एअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआय म्हणजेच थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे.

एअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआयला मोदी सरकारची मंजुरी

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळानं बुधवारी एअर इंडियामध्ये ४९ टक्के एफडीआय म्हणजेच थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे परदेशी एअर लाईन्स कंपन्या एअर इंडियामध्ये ४९ टक्क्यांपर्यंत भागीदारी करू शकते. तोट्यात चाललेल्या एअर इंडियाला वाचवण्यासाठी केंद्र सरकारनं हा प्रयत्न केला आहे.

उड्डाण क्षेत्रात प्रथमच एफडीएचे नियम शिथील केले आहेत. एफडीआयच्या नियमांतील शिथीलता हा आर्थिक सुधारणेकडील सरकारचे महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे.

रिटेल, बांधकाम, विमान क्षेत्रात गुंतवणूक

सिंगल ब्रँड रिटेल मध्ये १०० टक्के एफडीआयला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच बांधकाम क्षेत्र आणि विमान उड्डायन क्षेत्रात ४९ टक्के एफडीआयला मंजुरी दिली आहे. 

Read More