Marathi News> भारत
Advertisement

कॉंग्रेसच्या आरोपानंतर 'नमो अॅप'च्या डाऊनलोडमध्ये वाढ

 पंतप्रधानांच्या नमो अॅपमधून डेटा चोरीच्या आरोपांनंतर तब्बल २ लाख मोबाईल धारकांनी हे अॅप डाऊनलोड केल्याचा दावा भाजपनं केलाय.

कॉंग्रेसच्या आरोपानंतर 'नमो अॅप'च्या डाऊनलोडमध्ये वाढ

नवी दिल्ली : इंग्रजीत एक म्हण आहे...any publicity is good publicity...याच म्हणीच्या अनुभवानं सध्या भाजपच्या गोटात आनंदाचं वातवरण आहे. पंतप्रधानांच्या नमो अॅपमधून डेटा चोरीच्या आरोपांनंतर तब्बल २ लाख मोबाईल धारकांनी हे अॅप डाऊनलोड केल्याचा दावा भाजपनं केलाय.  काँग्रेसनं सध्या सोशल मीडियावर डिलीट नमो अॅप नावाचं एक कॅम्पेन सुरू केलंय.

नमो अॅपचा प्रसार

भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या खासदारांसोबत झालेल्या एका बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व खासदारांनी जनतेशी थेट संपर्कावर भर देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याअंतर्गत पक्षानं नमो अॅपच्या प्रसाराची एक खास मोहिम आखली होती. पण त्यातच मधल्या काळात डेटा चोरीचं प्रकरण पुढे आलं. आणि काँग्रेसनं #डिलीटनमोअॅप या हॅश टॅगसह विरोधी मोहीम सुरु केली.

उलटा परिणाम ?

पण त्याचा उलटा परिणाम झाल्याचा भाजपचा दावा आहे... विशेष म्हणजे केंब्रिज अॅनालिटाका आणि एकूणच डेटाचोरीचं प्रकरण पुढे आल्यावर काँग्रेसनं आपलं अॅप अॅन्ड्रोईडच्या प्ले स्टोअरवरून हटवून टाकलं.

Read More