Marathi News> भारत
Advertisement

तुम्हाला पडणाऱ्या भीतीदायक स्वप्नांचे रहस्यमय संकेत! वाचा आणि विचार करा

तुम्हाला पडणाऱ्या भीतीदायक स्वप्नांचे रहस्यमय संकेत! वाचा आणि विचार करा

तुम्हाला पडणाऱ्या भीतीदायक स्वप्नांचे रहस्यमय संकेत! वाचा आणि विचार करा

नवी दिल्ली : अनेक स्वप्न आपल्याला भीती घालतात. काही स्वप्नांमुळे दचकून उठायला होतं. स्वप्नांमध्ये घडणाऱ्या भीतीदायक घटनांमुळे काळजी करण्याचे कारण नाही. उलट असे काही स्वप्न तुम्हाला भविष्यातील आनंदाचे संकेत देत असतात. स्वप्न शास्त्राच्या मते भीतीदायक आणि नुकसान दाखवणारे स्वप्न भविष्यात फायद्याचे ठरू शकतात. अशा काही स्वप्नांमुळे धन लाभ होण्याची शक्यता असते. काही स्वप्न याकरीताच शुभ मानले जातात.

हे स्वप्न असतात लाभदायक

स्वप्नात आपल्या जवळच्या व्यक्तीची आत्महत्या किंवा मृत्यू 

स्वप्नात जवळच्या व्यक्तीची आत्महत्या किंवा मृत्यू पाहिल्यास घाबरू नका. हा एक चांगला संकेत आहे. व्यक्ती एखाद्या गंभीर रोगाने ग्रासित असेल, तर रोगातून लवकर बरे होण्याचा हा संकेत असतो. 

स्वप्नांत भांडणं दिसणे
स्वप्नात भांडणं होताना दिसले तर धनलाभ होण्याचे संकेत असल्याचे बोलले जाते. स्वप्नातील भांडणात तुम्ही स्वतःच जर जखमी झाल्याचे दिसल्यास पैशासोबतच यश सुद्धा तुम्हाला येत्या दिवसात प्राप्त होण्याचे संकेत असतात.

घराला जळताना पाहणे
स्वप्नात जर आपल्या घराला जळताना पाहत असाल तर, भीती वाटने स्वाभाविक आहे. याचा अर्थ असा होतो की, तुम्ही एखाद्या गोष्टीबाबत विचार करीत आहात. ती गोष्ट तुम्हाला मिळणार आहे.

स्वप्नात व्यक्तीला जळताना पाहणे
स्वप्नात एखाद्या व्यक्तीला जळताना पाहिल्यास तुम्हाला धनलाभ होण्याचे संकेत आहेत.

स्वप्नात केस कापताना पाहणे
जर स्वप्नात एखाद्या महिलेचे केस कापताना पाहिले तर लवकरच सोने चांदी मिळण्याच्या शक्यता आहे. तसेच पुरूषाचे केस कापतानाचे स्वप्न पडल्यास नोकरी, जमीन-संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत.

--------------------------------------

(वरील लेख सामान्य माहितीच्या आधारे आहे. झी 24 तास याची खात्री देत नाही)

Read More