Marathi News> भारत
Advertisement

आजार बरा करण्यासाठी बागेश्वर धामच्या कार्यक्रमात गेलेल्या महिलेचा मृत्यू; पती म्हणतो, बाबा तिला...

Bageshwar Baba : 26 वर्षीय धीरेंद्र कृष्ण शास्त्री कोणताही प्रश्न न विचारता लोकांच्या मनातील अडचणी समजून घेतात आणि त्या समस्यांवर उपायही सांगतात असा दावा आहे

आजार बरा करण्यासाठी बागेश्वर धामच्या कार्यक्रमात गेलेल्या महिलेचा मृत्यू; पती म्हणतो, बाबा तिला...

Bageshwar Dham Dhirendra Shastri : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा (Bageshwar Dham Dhirendra Shastri) हे नाव गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहे. महाराष्ट्रापासून (Maharashtra) सुरु झालेल्या वादानंतर बागेश्वर बाबा (Bageshwar Baba) प्रसिद्धिच्या झोतात आले आहेत.  कोणताही प्रश्न न विचारता लोकांच्या मनातील अडचणी समजून घेतात आणि त्या समस्यांवर उपायही सांगतात असा दावा धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या भक्तांकडून केला जातो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांचे भक्त त्यांच्याकडे जात असतात. अशीच एक महिला बागेश्वर धाममध्ये आपला आजार बरा करण्यासाठी गेली होती मात्र ती परतलीच नाही.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छतरपूर येथील बागेश्वर धामच्या (Bageshwar Dham) कार्यक्रमादरम्यान एका महिलेचा मृत्यू झालाय. ही महिला आजारी असल्याने तिची समस्या सोडवण्यासाठी बागेश्वर धाम येथे आली होती. महिलेने समस्या मांडण्यासाठी नंबर लावला होता. मात्र क्रमांक येण्यापूर्वीच महिलेचा मृत्यू झाला. महिला रांगेत उभी असताना बेशुद्ध पडली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशच्या बागेश्वर धाममध्ये धार्मिक महाकुंभ सुरु आहे. इथे  धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा लोकांच्या समस्या जाणून घेत आहे. अशातच त्याच्या  दरबारात 15 फेब्रुवारीला प्रचंड गर्दीत एक आजारी महिला आपल्या समस्या घेऊन तिथं आली होती. मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

नीलम देवी असे या महिलेचे नाव असल्याचे समोर आले आहे. बागेश्वर धाम परिसरात नीलन देवी आल्या असताना त्यांची तब्येच अचानक बिघडली. यामध्येच नीलमचा मृत्यू झाला अशी माहिती नीलमचे पती देवेंद्र सिंह यांनी दिली. "ती आजारी होती आणि मी रोज तिच्यासोबत परिक्रमा करत होतो. मधेच तिची प्रकृती ढासळायची. 15 फेब्रुवारीला सकाळी तब्येत थोडी बरी होती, म्हणून बागेश्वर धाममध्ये ती माझ्यासोबत समस्या मांडण्यासाठी आली होती. सकाळी तिने माझ्यासोबत जेवणही केले. पण संध्याकाळी अचानक तिची प्रकृती खालावली आणि मृत्यू झाला," अशी माहिती नीलम देवी यांच्या पतीने दिली.

संन्यासी बाबा तिला बरे करायचे

"बागेश्‍वर धामहून मिळालेली विभूती बायकोने मिळताच पोलिसांनी आम्हाला इथून हिला घेऊन जा असे सांगितले. त्यानंतर पत्नीला गाडीत घालून ती दोन तास शेताच्या बाजूला उभी केली. त्यानंतर रुग्णवाहिकेने तिले रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी निलमला मृत घोषित केले.  गेल्या 8 महिन्यांपासून ती बरी होती. व्यवस्थित जेवायची, हिंडायची. संन्यासी बाबा तिला बरे करायचे. तिची तब्येत पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटायचे," असेही देवेंद्र सिंह म्हणाले.

Read More