Marathi News> भारत
Advertisement

Mother's Day 2023 : 'इट्स अ मॉम थिंग' शॉर्ट फिल्ममधून जगात भारी आईला अनोख्या शुभेच्छा, पाहा भारावणारा VIDEO

Mothers Day viral video : आई शब्दातच जणू काही आलं...आईशिवाय या जगाची कल्पनाच होऊ शकतं नाही. म्हणूनच मदर्स डेसाठी एअर इंडियाकडून (air india releases short film) जगातील सर्व आईला अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. 'इट्स अ मॉम थिंग' ही शॉर्ट फिल्ममधून प्रत्येकच जण भारावतोय.

Mother's Day 2023 : 'इट्स अ मॉम थिंग' शॉर्ट फिल्ममधून जगात भारी आईला अनोख्या शुभेच्छा, पाहा भारावणारा VIDEO

Mothers Day short film : आई म्हणजे ममता, आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे देवता...असं म्हणतात की प्रत्येक स्त्रीमध्ये आई लपलेली असते पण जेव्हा ती तिच्या अपत्यास जन्म देते तेव्हा तिच्या मातृत्वाचा झरा वाहायला लागतो. म्हणून मोठा बहिणीत आपल्या आई दिसते. मुळात स्त्रीही प्रेम, माया या भावनांनी भरलेली असते. ती आपल्या कुटुंबाची छत्रछाया असते. तिच्या मायेचा झाडाखाली अनेक फळं सुरक्षित वाढतं असतात. असं म्हणतात देव सगळ्यांकडे पोहोचू शकतं नाही म्हणून त्याने आईची निर्मिती केली. मुलाला वाईट गोष्टींपासून वाचवित मायेने आणि शिस्तेतीने त्याला या जगातील संघर्षांशी लढण्यासाठी तयार करणारी एक एक माऊली...प्रत्येक पाल्यासाठी त्यांच्या आयुष्यातील पहिला गुरु...(Mothers Day 2023 air india releases short film Its A Mom Thing video trending on google )

आई माझी मायेचा सागर

प्रत्येकासाठी आई माझी मायेचा सागर असते. आईरुपी देवतीचा दिवस म्हणजे मदर्स डे. जगभरात मे महिन्यातील दुसऱ्या रविवारी 14 मे 2023 मातृदिन (14 may 2023) साजरा केला जातो. तिच्याबद्दल आपल्या मनातील भावनांना सांगण्याचा हा उत्तम दिवस असतो. आई ही कुठेही असो, तिचा रंग, तिची जात तिचा देश कुठलाही असो...ती फक्त एक आई असते. जी प्रेम, माया आणि काळजीने भरलेली असते. त्याचा मुलांमध्ये तिचा जीव अडकलेला असतो. तिचं आयुष्य या पोरांच्या आजूबाजूला फिरत असतं. ती वेळ प्रसंगी उपाशी राहिल पण आपल्या मुलांना पोटभरून खायला घालेल. अगदी संकटात ही ती मुलांसोबत ढाल बनून उभी असते. मृत्यूच्या दाढीतून मुलांचा जीव वाचविणारी ती एक आई असते. 

आई म्हणजे प्रेमसागर !

या जगातील प्रत्येक आईला एअर इंडिया या कंपनीने 'इट्स अ मॉम थिंग' शॉर्ट फिल्ममधून अनोख्या पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. प्रत्येकाला भारावून सोडणारी ही शॉर्ट फिल्म नेटकऱ्यांचं मन जिंकतेय. 

एअर इंडिया या कंपनीने त्यांच्या यूट्यूबवरील अधिकृत अकाऊंटवर शेअर केली आहे. या व्हिडीओतून जगभरातील आईची मुलांची भावना दाखविण्यात आली आहे. मुलं कितीही मोठी झाली तरी ती आईच्या कुशीत विसावतात. संकट प्रसंगी आईचा मायेचा हात अनेक लढाईसाठी लाखोचं बळ देऊन जातं.  मुलांच्या जेवण्यापासून त्यांचा प्रत्येक गोष्टींची आईला चिंता असते. मुलांच्या मनात काय सुरु आहे ही आई लगेचच समजून घेते. 

Read More