Marathi News> भारत
Advertisement

'या' चिमुकलीचा Video आठवतो का? आई सोशल मीडियावर इतकी ट्रोल झाली, की तिनं जीवच दिला

घटनेच्या 21 दिवसांनंतर सोशल मीडियावर ट्रोल झाल्यानंतर ती महिला आई वडिलांच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळली. सत्य घटना न जाणून घेता त्यांनी त्या आईला ट्रोल केलं अन्...

 'या' चिमुकलीचा Video आठवतो का? आई सोशल मीडियावर इतकी ट्रोल झाली, की तिनं जीवच दिला

Social Media Viral News : सोशल मीडियावर गेल्या महिन्यात 28 एप्रिलला एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यामध्ये एक 8 महिन्यांचा चिमुकला निळा रंगाच्या प्लास्टिक शीटवर लटकलेला दिसत होता. तो चिमुकला आईच्या हातातून वरुन पडला आणि त्या प्लास्टिकच्या शीटवर अकडला. त्या निष्पाप जीवाला बिल्डिंगमधील लोकांनी अथक परिश्रमानंतर वाचवलं. 

आई ठरली सोशल मीडिया ट्रोलिंगची शिकार!

पण त्यानंतर सोशल मीडियाच्या ट्रोलिंगची शिकार त्या चिमुकल्याचा आई झाली. घटनेचं सत्य न जाणून घेता त्या महिलेला सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं. पण बिल्डिंगमधील लोकांचं तोंडभरून कौतुक केलं. सोशल मीडियावर त्या आईला निष्काळजीपणाबद्दल खूप ऐकविण्यात आले. खरं तर या घटनेच्या वेळी बिल्डिंगमधील जे कोणी तिथे उपस्थितीत होते त्यांनी सोशल मीडियावर आईविरोधात लावण्यात आलेले आरोप फेटाळले आहेत. हा फक्त एक अपघात होता असं त्यांचं सांगणं आहे. 

या घटनेनंतर चिमुकल्याला घेऊन ती महिला माहेरी गेली होती. घटनेला 21 दिवस उलटून गेले होते. पण सोशल मीडियावर या आईला निष्काळजीपणाचा टॅग लावण्यात आला होता. तिला हे सगळे आरोप असह्य झाले. ती आई वडिलांच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. 

सूत्रांच्या माहितीनुसार सोशल मीडियाच्या ट्रोलिंगमुळे तिच्या मानसिक स्थितीवर खूप वाईट परिणाम झाला होता. त्या महिलेचं नाव राम्या असून तिच्या नवऱ्याचं नाव व्यंकटेश होतं. हे दोघे आयटी प्रोफेशनल होते आणि चेन्नईत काम करत होते. त्या घटनेनंतर महिला करमदई इथे माहेरी आली होती. तिथे रविवारी 19 मे रोजी आईवडील एका कार्यक्रमासाठी बाहेर गेले असताना ही घटना घडली. दरम्यान कोईम्बतूरमधील करमादई पोलीस ठाण्यात आयपीसीच्या कलम 174 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

 

Read More