Marathi News> भारत
Advertisement

जाणून घ्या का खास आहे PM मोदींचं VVIP हायटेक विमान

पंतप्रधानांचा अमेरिका दौरा जितका खास आहे, तितकंच हे विमानही खास आहे... 

जाणून घ्या का खास आहे PM मोदींचं VVIP हायटेक विमान
Updated: Sep 24, 2021, 09:37 AM IST

नवी मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. कोरोनाची लाट आल्यानंतर मोदींचा हा पहिलाच अमेरिका दौरा ठरत आहे. अनेक उच्चस्तरीय बैठकींसोबतच मोदी या दौऱ्यामध्ये काही महत्त्वाच्या व्यक्तींची भेट घेत आहेत. त्यांचा हा दौरा साऱ्या जगाचं लक्ष वेधत असून, ज्या विमानानं पंतप्रधान अमेरिकला पोहोचले आहेत ते विमानही असंख्य चर्चांच्या निमित्तानं गाजतंय. (modi us visit)

आतापर्यंत जितके भारतीय पंतप्रधान अमेरिकेला जात होते, त्यांच्या प्रवासादरम्यान एक थांबा फ्रँकफर्ट येथे असे. पण, 'एयर इंडिया वन' च्या सोबतीनं मोदींनी थेट वॉशिंग्टनच गाठलं. फ्रँकफर्टमध्ये विमान न थांबण्याची ही घटना अनेक वर्षांनंतर घडली. 

नव्यानंच ताफ्यात समाविष्ट करण्यात आलेल्या बोईंग 777 VVIP या एअर इंडियाच्या विमानानं पंतप्रधान मोदी बुधवारी सकाळी जवळपास 11 वाजता नवी दिल्लीहून अमेरिकेसाठी रवाना झाले होते. वॉशिंग्टन येथील जॉईंट बेस अँड्र्यू इथं भारतीय प्रमाण वेळेनुसार गुरुवारी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास ते पोहोचले. 'एयर इंडिया वन'च्या या विमानाच्या बाहेरील लूक पाहिला तर त्यावर एक अशोक चक्र आहे. तर, दरवाजावरही हिंदीमध्ये भारत लिहिलं आहे. दुसऱ्या बाजूला इंग्रजीत इंडिया असं लिहिण्यात आलं आहे. विमानाच्या खालच्या बाजुला राष्ट्रीय ध्वज पाहायला मिळत आहे. 

fallbacks

fallbacks

'एयर इंडिया वन'च्या या विमानात एक कॉन्फरन्स रुम आहे. वीवीआयपी प्रवाशांसाठी एक केबिन, आपात्कालीम वैद्यकिय केंद्रासोबत काही महत्त्वाच्या व्यक्तींसाठीची आसन व्यवस्थाही या विमानात आहे. 'एयर इंडिया वन'मधील आणखी एक खास बाब म्हणजे एकदा इंधन भरल्यानंतर हे विमान सलग 17 तास उड्डाणासाठी सक्षम आहे. 

एडवांस्ड इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरची व्यवस्था या विमानात करण्यात आली असून, हल्ला थांबवण्यासोबत हल्ला झाल्यास त्याचं प्रत्युत्तर देण्याची क्षमताही या विमानात आहे. सेल्फ प्रोटेक्शन सूट असणारं हे पहिलं विमान आहे जे शत्रूच्या रडार सिग्नललाही निकामी करुन जवळच्या मिसाईलची दिशाही बदलू शकतं. 

fallbacks

वायुदलाच्या विमानांप्रमाणंच या प्रकारच्या विमानात उड्डाणासाठी असिमीत रेंज आहे. जे एकाच वेळी जगभरात प्रवास करु शकतं. अटीतटीच्या वेळी या विमानात हवेतल्या हवेतही इंधन भरता येण्याची सोय आहे. ट्विन इंजिन GE90-115 असणारं एअर इंडियाचं हे विमान प्रतितास 559.33 किमीहूनही अधिक वेगानं उड्डाण भरतं.