Marathi News> भारत
Advertisement

राजस्थानमध्ये आधुनिक रिफायनरीच्या प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बाडमेर येथील पचपदरामध्ये आधुनिक रिफायनरीच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला. २०२३ पर्यंत या प्रकल्पाची उभारणी होणार आहे.

राजस्थानमध्ये आधुनिक रिफायनरीच्या प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते शुभारंभ

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बाडमेर येथील पचपदरामध्ये आधुनिक रिफायनरीच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला. २०२३ पर्यंत या प्रकल्पाची उभारणी होणार आहे.

 सुमारे ४३ हजार कोटींचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे अंदाजे एक लाख लोकसंख्येला रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. दरम्यान, यावेळी मोदी यांनी काँग्रेसवर टीका करण्याची संधी सोडली नाही.

या रिफायनरीचं वैशिष्ट्य म्हणजे देशातील ही पहिली इको फ्रेंडली रिफायनरी असणार आहे. त्याच बरोबर रिफायनीतील वेस्टपासून २५० ते ३०० मेगावॅट वीजेचं उत्पादन होणार आहे. आगामी ३० वर्षांत ९ मिलियन टन उत्पादनाचं उद्दीष्ट आहे. 

 

Read More