Marathi News> भारत
Advertisement

womens day : महिला आमदाराला घोडा Gift, थेट घोड्यावर विधानसभेत

झारखंडच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बरकागावच्या काँग्रेस आमदार अंबा प्रसाद घोड्यावरुन विधानसभेत पोहोचल्या. तेव्हा सर्वांनाच

womens day : महिला आमदाराला घोडा Gift, थेट घोड्यावर विधानसभेत

राँची : झारखंडच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात बरकागावच्या काँग्रेस आमदार अंबा प्रसाद घोड्यावरुन विधानसभेत पोहोचल्या. तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. आमदार अंबा प्रसाद यांना सुरक्षा कर्मचार्‍यांनी विधानसभेच्या प्रवेशद्वारावर रोखले. त्याचवेळी आमदारांची स्टाईल पाहून तिथे लोकांची गर्दी देखील जमली. यावेळी अंबा प्रसाद यांनी मला घोड्यावरुन आल्याचा अभिमान वाटतो असे सांगितले.

झारखंड विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी काँग्रेसचे आमदार अंबा प्रसाद यांच्या या स्टाईलवर दिवसभर चर्चा होती. आमदार म्हणाले की, हे माझ्यासाठी चांगले भविष्य आहे. अर्जुन पुरस्कार विजेते कर्नल रवी राठोड यांनी हा घोडा त्यांना भेट म्हणून दिला आहे. या घोड्यास्वारीचा त्यांना अभिमान आहे.

fallbacks

विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरक्षा दलाने गेटवरच घोड्यावरुन विधानसभेत आलेल्या आमदार अंबा प्रसाद यांना रोखले. 'तुम्हाला घोड्याशिवाय आत जावे लागेल तुम्हाला आत प्रवेश नाही' असं विधानसभेतील सुरक्षा कर्मचार्‍यांनी आमदार अंबा प्रसाद यांना सांगितले. 

आम्ही आमचं कर्तव्य बजावत आहोत. घोड्यासह प्रवेश करू नये असा आदेश आहे. घोड्यासह आत जाण्यास त्यांनी घोडा थांबविला. तुम्ही घोड्याशिवाय विधानसभा भागात प्रवेश करू शकता असंही ते म्हणाले.

8 मार्च रोजी संपूर्ण जग आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करतो. राष्ट्र, जाती, भाषा, राजकरण सांस्कृतिक, भेदा पलीकडे एकजुटीने महिलादिन साजरा केला जातो. पूर्वी भारतातील स्त्रिया स्वत:च्या अधिकारात कमी बोलत असत, पण आज २१ व्या शतकातील स्त्रीने स्वत: चे सामर्थ्य ओळखलं आहे.  तिच्या हक्कांसाठी मोठ्या प्रमाणात आवाज उठवला आहे. प्रत्येक क्षेत्रात महिलांचं एक पाऊल पुढे असल्याचं पहायला मिळतं.

Read More