Marathi News> भारत
Advertisement

टाटांनी दिलेली नोकरीची संधी नाकारली, नंतर स्वतःचीच कंपनी उभारली, आज 586000 कोटींचा मालक

Business News In Marathi: भारतातील उद्योजकांच्या यशस्वीगाथा या नेहमीच तरुणांसाठी प्रेरणादायक ठरतात. 

टाटांनी दिलेली नोकरीची संधी नाकारली, नंतर स्वतःचीच कंपनी उभारली, आज 586000 कोटींचा मालक

Business News In Marathi:  रतन टाटा हे भारतातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. एक यशस्वी उद्योगपती असण्याबरोबरत ते त्यांच्या दानशूरपणामुळंही ओळखले जातात. उद्योगजगतातील त्यांचे प्रतिस्पर्धीही आदराने त्यांचे नाव घेतात. रतन टाटा यांच्या कंपनीबाबतचा एक किस्सा प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांनी सांगितला आहे. 

उद्योगजगतामध्ये नारायण मूर्ती यांचे नावही आदराने घेतले जाते. नारायण मूर्ती यांचा संघर्ष अनेक युवकांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. त्यांनी स्थापन केलेली कंपनी आज यशाच्या शिखरावर आहेत. आज आपल्या सगळ्यांनाच माहितीये नारायण मूर्ती हे आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसचे संस्थापक आहेत. पण इतकी मोठी कंपनी उभारण्याआधी ते इतर सामान्य नागरिकांप्रमाणेच संस्थांमध्ये नोकरी करत होते. 

नारायण मूर्ती यांनी आयआयटी कानपूर येथून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा कॉर्पोरेट क्षेत्रात पहिले पाऊल टाकले तेव्हा अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांकडून त्यांना नोकरीसाठी ऑफर्स येत होत्या. रतन टाटा यांची एअर इंडिया, टेल्को, टिस्को यासारख्या नावाजलेल्या कंपन्यांकडून त्यांना नोकरीच्या संधी चालून येत होत्या. मात्र, या सगळ्या संधी नाकारुन त्यांनी Indian Institute of Management (IIM) अहमदाबाद येथे चीफ सिस्टिम प्रोग्रॅमर म्हणून काम करणे पसंत केले. 

नावाजलेल्या कंपन्यांकडून नोकरीच्या संधी येत असताना त्यावर निर्णय घेणे नारायण मूर्ती यांच्यासाठी खूप कठिण होते. या कंपन्या मूर्ती यांना गलेलठ्ठ पगारही देत होत्या मात्र, या नोकरऱ्यांवर पाणी सोडत त्यांनी IIM-A मध्ये मुख्य सिस्टीम प्रोग्रामरचे काम करण्याचा निर्णय घेतला.

नारायण मूर्ती यांनी 2019मध्ये एक मुलाखत दिली होती. त्यावेळेस त्यांनी टाटासारख्या कंपनीतून आलेली नोकरीची संधी नाकारुन IIM-A मध्ये सामील होण्याचा निर्णय का घेतला, हे सांगितले. कारण IIM-A भारतात प्रथमच sharing system प्रणाली स्थापन करण्याची योजना आखत होते. आमच्या बॅचमध्ये एकूण 16 विद्यार्थी होते आणि त्यांच्यातील मी एकमेव होतो ज्याने आधुनिक ऑपरेटिंग सिस्टिम शिकण्यासाठी अर्धा पगारावर काम करण्याची तयारी दर्शवली. यामुळं मला अकाऊंटिंग, सिम्युलेशन, फायनान्स, प्रोडक्शन इत्यादींची माहिती मिळावी म्हणून मी हा पर्याय निवडला आणि कदाचित हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय आहे, असं नारायण मूर्ती यांनी म्हटलं आहे. 

नाराणय मूर्ती यांनी सुरुवातीला अर्ध्या पगारावर नोकरी केली. मात्र आता त्यांची नेट वर्थ जवळपास 39,898 कोटी इतकी आहे. नारायण मूर्ती यांनी सहा सॉफ्टवेअर व्यावसायिकांसह 1981 मध्ये केवळ 10,000 रुपयांची गुंतवणूक करत इन्फोसिस कंपनी सुरू केली. इन्फोसिसचे सध्याचे मार्केट कॅपिटल 5,86,600 कोटी इतके आहे. 

Read More