Marathi News> भारत
Advertisement

मथुरेचा Hero! धावत्या ट्रेनमध्ये पोहचवलं औषध; डॉक्टरांच्या मदतीला देवासारखा धावला

Medicine Shopkeeper did a heart wrenching act:  प्रेम औषध घेऊन तयार होता. ट्रेन मथुरा येथे फक्त दोन मिनिटे थांबणार होती. ट्रेन आल्यावर प्रेम औषध घेऊन येईल, अशी आशा सर्वजण करत होते. मात्र...

मथुरेचा Hero! धावत्या ट्रेनमध्ये पोहचवलं औषध; डॉक्टरांच्या मदतीला देवासारखा धावला

Trending :  आरोग्य (Health) हीच खरी धनसंपदा आहे, असं म्हणतात. कधी कोणासोबत काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे धगधगत्या जीवनप्रवासात सर्वांनी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. मेंदाता हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ.अरविंद सिंग सोईन (Dr. Arvinder Singh Soin) यांच्यासोबत अशीच एक घटना घडली. त्यांचा किस्सा त्यांनी ट्विट (Tweet) करत शेअर केला आहे.

झालं असं की...

मेंदाता हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी एक किस्सा सांगितला आहे. किस्सा असा आहे की, मथुरा स्टेशनवर (Mathura Railway Station) दोन मिनिटांच्या थांब्यातही एक मेडिकल स्टोअरचा (Medical Store) माणूस धावत आला, औषध पोहोचवलं तरीही त्याने जास्तीचे पैसे घेतले नाहीत. तो रुग्ण बरा व्हावा अशी प्रार्थना करून निघून गेला. डॉ.अरविंद सिंग सोईन हे रेल्वेने दिल्लीहून रणथंबोरला जात होते.

डॉ.अरविंद सिंग सोईन यांचा एक साथीदार आजारी पडला. त्याला औषधाची गरज होती. मात्र त्याच्याकडे औषधे नव्हती. ट्रेनचा पुढचं स्टेशन मथुरा होतं.अरविंद सिंग यांनी सर्च केलं की मथुरा स्टेशनजवळ काही मेडिकल स्टोअर आहे का? आपल्याला पुढच्या स्टेशवर औषध घेता येतील का?, असा विचार करत असताना त्यांना एका दुकानदाराचा नंबर मिळाला.

प्रेम नावाच्या व्यक्तीनं रेल्वे स्टेशनवर येऊन औषध पोहोचवणार असल्याचं सांगितलं. प्रेमला कोचचा नंबर आणि रेल्वे कधी येणार याचा टाईम सांगितला. त्यानुसार प्रेम औषध घेऊन तयार होता. ट्रेन मथुरा येथे फक्त दोन मिनिटे थांबणार होती. ट्रेन आल्यावर प्रेम औषध घेऊन येईल, अशी आशा सर्वजण करत होते. मात्र, प्रेमला रेल्वेचा कोच शोधायला थोडा वेळ लागला. 

आणखी वाचा - भावा जिंकलस रे! बाप-लेकाचा VIDEO पाहुन तुमच्याही डोळ्यात येईल पाणी

दरम्यान, रेल्वे (Railway) सुरू झाली त्यावेळी सर्वांची धाकधूक वाढत होती. तेवढ्यात प्रेमला बोगी सापडली. त्याने धावत औषधं डॉ.अरविंद सिंग यांच्या हातात पोहोचवली. त्यावेळी डॉ.अरविंद सिंग यांनी दिलेले जास्तीचे पैसे देखील त्याने घेण्यास नकार दिला. डॉ.अरविंद सिंग यांनी ट्विट करत प्रेमचे आभार मानले आहेत.

Read More