Marathi News> भारत
Advertisement

Maruti Suzuki च्या किंमतीत एका वर्षात तिसऱ्यांदा वाढ; कच्च्या मालाच्या वाढत्या दरामुळे कंपनीचा निर्णय

देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारूती सुजुकी इंडियाने (MSI)ने सोमवारी म्हटले की, सेलेरिओ वगळता सर्व कारच्या किंमतींमध्ये 1.9 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. 

Maruti Suzuki च्या किंमतीत एका वर्षात तिसऱ्यांदा वाढ; कच्च्या मालाच्या वाढत्या दरामुळे कंपनीचा निर्णय

मुंबई : देशातील सर्वात मोठी कार निर्माती कंपनी मारूती सुजुकी इंडियाने (MSI)ने सोमवारी म्हटले की, सेलेरिओ वगळता सर्व कारच्या किंमतींमध्ये 1.9 टक्क्यांपर्यंत वाढ केली आहे. ही वाढ त्वरीत लागू करण्यात येणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की,  कच्च्या मालाच्या किंमतींमध्ये वाढ झाल्याने वाहनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका वर्षात तिसऱ्यांदा वाढवल्या किंमत
मारुती सुजुकीने एका वर्षात तिसऱ्यांदा आपल्या कारांच्या किंमती वाढवल्या आहेत. याआधी जानेवारी आणि एप्रिलमध्ये साधारण 3.5 टक्क्यांनी वाढ केली होती. ऍॆट्री लेवल हॅचबॅग अल्टो (Alto)पासून ते एस क्रॉस (S-Cross)पर्यंत  अनेक मॉडल विकते. ज्यांची किंमत 2.99 लाख रुपयांपासून ते 12.39 लाख रुपयांपर्यंत आहे. मारूतीने मागील महिन्यात म्हटले होते की,  वाहनांच्या किंमती वाढवणे गरजेचे आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमतींमुळे नफ्याच्या प्रमाणाकडेही लक्ष देणे क्रमप्राप्त असते.

दरम्यान, तांब्याच्या किंमती 5200 डॉलर प्रति टनने म्हणजे 10 हजार डॉलर प्रति टन झाले आहेत. तसेच मेटलच्या किंमती एमिशन नॉर्म्समुळे भारत आणि ग्लोबल मार्केटमध्ये वाढल्या आहेत. रोडियमची किंमत मे 2020 मध्ये 2020 मध्ये 18 हजार रुपये प्रति ग्रामने वाढून जुलैमध्ये 64300 रुपये प्रति ग्रॅम झाली आहे.

Read More