Marathi News> भारत
Advertisement

एकाहून अधिक बॅंक अकाऊंट असणाऱ्यांना होऊ शकते 'हे' नुकसान

एकापेक्षा जास्त अकाऊंट असणाऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

एकाहून अधिक बॅंक अकाऊंट असणाऱ्यांना होऊ शकते 'हे' नुकसान

नवी दिल्ली : अनेकजण आपले आर्थिक व्यवहार दोन किंवा अधिक बॅंकांमधून करत असतात. नोकरदार वर्गाला नोकरीच्या ठिकाणी काही ठराविक बॅंकेत उघडण्यासाठी सांगितले जाते. मग नोकरी बदलल्यावर बॅंकही बदलली जाते. व्यवसाय करणाऱ्यांनाही दोन किंवा त्यापेक्षा अधिक बॅंकामध्ये अकाऊंट असणे उपयोगी पडते. पण बऱ्याचदा हे बॅक अकाऊंट सुरू ठेवणे प्रत्येकाला जमत नाही. नोकरदार वर्गाचे एक सॅलरी अकाऊंट तर दुसरे पर्सनल अकाऊंट असते. पण एकापेक्षा जास्त अकाऊंट असणाऱ्यांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. 

सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान रक्कम असणे अपेक्षित असते. असे न केल्यास बॅंक तुमच्याकडून पेनल्टी वसूल करते. काही बॅंकामध्ये तर किमान रक्कम 10 हजार रुपये आहे. अशावेळी दोन अकाऊंट संभाळणे कठीण होऊन जाते. सर्वसाधारण माणसाला बॅंकेमध्ये 20 हजार रुपये ठेवणे देखील कठीण असते.

fallbacks

इनकम टॅक्स 

fallbacks

अनेक बॅंकामध्ये अकाऊंट असल्याने अडचणींचा सामना करावा लागू शकतो. कागदी कारवाईमध्ये तुम्हाला डोकेफोडी करावी लागू शकते. इनकम टॅक्स फाईल करताना सर्व बॅंक खात्यातील माहिती द्यावी लागते. त्यावेळी सर्व बॅंकामधील डेटा गोळा करणेही कठीण होते.

जादा रक्कम 

fallbacks

अनेक अकाऊंट असल्यास तुम्हाला वर्षाला मेंटेनंस फिस सर्व्हिस चार्ज द्यावा लागतो. क्रेडीट आणि डेबिट कार्ड व्यतिरिक्त अनेक सुविधांसाठी बॅंक तुमच्याकडून चार्ज घेत असते. इथे देखील तुम्हाला नुकसान होऊ शकते.

कमी व्याज 

fallbacks

एकहून अधिक बॅंक अकाऊंट असल्यास तुम्हाला कमी व्याजाच्या रुपात नुकसान होऊ शकते. एकहून अधिक अकाऊंट असल्यास तुमची मोठी रक्कम विविध बॅंकेत अडकून राहते. या रक्कमेवर तुम्हाला जास्तीत जास्त 4 ते 5 टक्के रक्कम मिळते. तुम्ही जर हिच रक्कम इतर गुंतवणूक प्लानमध्ये टाकलात तर त्यातून तुम्हाला जास्त परतावा मिळू शकतो. तसेच यासोबत जास्त व्याज देखील मिळू शकते. 

Read More