Marathi News> भारत
Advertisement

VIDEO: साई बाबासमोर टेकवलं डोकं अन् जागीच झाला मृत्यू, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!

Silent heart attack Viral Video: राकेश महानी (Rakesh Mahani) नावाचा व्यक्ती मंदिरात (Temple) देवाला प्रदक्षिणा घालत होता. त्यानंतर तो पाया पडण्यासाठी खाली बसला आणि त्यानंतर उठलाच नाही.

VIDEO: साई बाबासमोर टेकवलं डोकं अन् जागीच झाला मृत्यू, थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद!

CCTV Viral Video: कधी कोणी मृत्यू पाहिलाय का? कोणत्याही क्षणी कोणासोबत काय होईल सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार मध्यप्रदेशमधील (Madhya Pradesh) कटनीमधून समोर आला आहे. साई बाबासमोर डोकं टेकवणाऱ्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर (viral video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. 

राकेश महानी (Rakesh Mahani) नावाचा व्यक्ती मंदिरात (Temple) देवाला प्रदक्षिणा घालत होता. त्यानंतर तो पाया पडण्यासाठी खाली बसला आणि त्यानंतर उठलाच नाही. डोकं साई बाबासमोर (Sai Baba) टेकवून तो पाया पडण्यासाठी गेला. त्यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा झटका (heart attack) आला. त्यावेळी त्याने कोणतीही हालचाल केली नाही.

आणखी वाचा - VIDEO: शिंक आली अन् तो मेला... अचानक असं काय घडलं? पाहा मृत्यूचा LIVE थरार!

डोकं पायावर खूप वेळ टेकवून बसल्याचं कळाल्यानंतर आसपासच्या लोकांना थोडा संशय आला. त्याआधी अनेक लोक त्याच्या जवळून गेले. मात्र, त्याच्यासोबत असं काही झालंय, याचा पत्ता देखील कोणाला लागला नाही.

पाहा Video -

दरम्यान, बराच वेळ राजेश उठला नाही, हे पाहून त्याच्या आजूबाजूला अनेकजण जमा झाले. त्यानंतर पुजाऱ्याने हिंम्मत करून राजेशला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यानं तोपर्यंत अंग सोडलं होतं. त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी डॉक्टरांनी राजेशला मृत (Dead) घोषित केलं. राजेशला सायलेंट हार्ट अटॅक (Silent heart attack) आल्याचा संशय व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे.

Read More