Marathi News> भारत
Advertisement

भारतीयांसाठी अभिमानास्पद! मेजर राधिका सेन यांना मिळणार यूएनचा प्रतिष्ठित पुरस्कार

Major Radhika Sen: खरी लीडर आणि आदर्श या शब्दांत यूएनचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी राधिका यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.  

भारतीयांसाठी अभिमानास्पद!  मेजर राधिका सेन यांना मिळणार यूएनचा प्रतिष्ठित पुरस्कार

Major Radhika Sen: भारतीयांसाठी अभिमानास्पद बातमी समोर येतेय. भारताच्या मेजर राधिका सेन यांना संयुक्त राष्ट्र संघाचा प्रतिष्ठित पुरस्कार दिला जाणार आहे. त्या काँगोमधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये सेवा बजावत आहेत. भारतीय महिला शांती सैनिक मेजर राधिका सेन यांना प्रतिष्ठित मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. सर्व भारतीयांसाठी ही कौतुकास्पद बाब आहे.

खरी लीडर आणि आदर्श या शब्दांत यूएनचे प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी राधिका यांच्याबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.  

कोण आहेत राधिका सेन?

राधिका सेन यांचा जन्म 1993 मध्ये हिमाचल प्रदेशमध्ये झाला. मेजर राधिका 8 वर्षांपूर्वी भारतीय लष्करात दाखल झाल्या होत्या. त्यांनी बायोटेक अभियांत्रिकीमध्ये पदवी पूर्ण केली. यानंतर आयआयटी मुंबईतून पदव्युत्तर पदवी घेतली. पुढे सशस्त्र दलात सामील होण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

काँगोमध्ये तैनात

मार्च 2023 मध्ये इंडियन रॅपिड डिप्लॉयमेंट बटालियनसोबत काँगोमध्ये त्यांना तैनात करण्यात आलं. एप्रिल 2024 मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. यापूर्वी हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मेजर सुमन गवानी यांना देण्यात आला होता. मेजर सुमन यांनी दक्षिण सुदानमध्ये संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये काम केले आणि त्यांना 2019 मध्ये हा सन्मान देण्यात आला.

Read More