Marathi News> भारत
Advertisement

बापरे! वाघानं चक्क दातानं ओढली Mahindra Xylo, व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले...

आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

बापरे! वाघानं चक्क दातानं ओढली Mahindra Xylo, व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले...

मुंबई : सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) होत असतात. नेहमीच हे व्हिडीओ हसवणारे किंवा मग प्राण्यांचे असतील असं नाही. कधी कधी काही व्हिडीओ तर आपल्याला खूप काही शिकवून जातात. काही मजेदार व्हिडिओ असतात तर काहींमध्ये विचित्र घटना पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ आनंद महिंद्रा  (Anand Mahindra) यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

आनंद महिंद्रा हे नेहमीच सोशल मीडियावर त्यांच्या ट्वीटच्या माध्यमातून इंटरेन्स्टिंग व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांनी शेअर केलेला असाच एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत एक वाघ (Tiger) चक्क महिंद्राचीच झायलो (Mahindra Xylo) की कार चक्क दातानं ओढताना कॅमेऱ्यात (Camera) कैद झाला आहे. (Trending Video)

हा व्हिडीओ ऊटी ते म्हैसूर मार्गावरचा आहे. थेप्पाकडूजवळ एका प्रवाशानं ही घटना त्याच्या फोनच्या कॅमेऱ्यात कैद केली आहेत. रस्त्यावर चक्क वाघानं एक झायलो कार अडवली. वाघानं ही गाडी फक्त अडवली नाही तर तिला दातानं पकडून मागंही खेचलं. या सगळा प्रकार पाहून अनेकांना घाम फुटला असेल हे नक्की. (Trending Viral Video)

वाघ जेव्हा ही गाडी दातानं ओढत होता, तेव्हा झायलो कारमध्ये बसलेल्या प्रवाशी घाबरल्याचे दिसत होते. गाडीत त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. हा वाघ झायलो कारच्या बंपरला दातानं तोडता. त्यानंतर आपल्या त्या तोडलेल्या बंपरचा भाग घट्ट पकडून वाघ ही गाडी मागे खेचू लागतो. कारच्या खिडक्यांना सुरक्षाकवच लावण्यात आलं होतं. (Mahindra Xylo car was pulled only by teeth s of tiger Anand Mahindra was not even surprised Video Viral) 

दरम्यान हा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा म्हणाले, 'झायलो कारचा बंपर चावणाऱ्या या वाघाचं वागणं पाहून, मला जराही आश्चर्य वाटलं नाही. ही गाडी चविष्ट असल्याचं माझा अनुभव वाघालाही आला', असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. दीड मिनिटांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओला आता पर्यंत ५ लाख ७७ हजार पेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. 

Read More