Marathi News> भारत
Advertisement

बजेट कितीये? कार घेण्यासाठी ही सुवर्णसंधी; मिळतेय 80 हजारांहून अधिकची ऑफर

कारच्या किंमतीत मोठी घसरण

बजेट कितीये? कार घेण्यासाठी ही सुवर्णसंधी; मिळतेय 80 हजारांहून अधिकची ऑफर

मुंबई : मनाजोगी नोकरी, गरजा भागवूनही उरतील इतका पैसा देणारा पगार आणि स्वत:चं घर ही अशी अनेकांची स्वप्न असतात. जीवनातील प्रत्येक टप्प्यावर काही गोष्टी साध्य करण्याचं ध्येय्य प्रत्येकानं उराशी बाळगलेलं असतं. याच स्वप्नांच्या रांगेत आणखी एक सातत्यानं खुणावणारी गोष्ट म्हणजे कार खरेदी करण्याची इच्छा. 

एकदा तरी स्वत:ची कार घेऊ, अमुक रंगाची, तमुक कंपनीची ही सारी गणितं आखली जातात. पण, पुढे जाऊन हे गणित अडतं ते म्हणजे कारच्या किंमतीवर. (Mahindra )

एकरकमी इतकी महाग वस्तू खरेगी करणं सर्वांनाच जमत नाही. पण, अशा वेळी मग कार लोन वगैरेसारखे पर्याय उलब्ध असतात. 

या साऱ्यात मोलाचा हातभार लागतो तो म्हणजे सवलतींचा. सध्या अशाच सवलती देत आहे महिंद्रा ही कंपनी. 

जानेवारी महिन्यासाठी ही ऑफर महिंद्रा कंपनीकडून लागू करण्यात आली आहे. जिथं सर्वाधिक सवलतीची रक्कम ही तब्बल 81 हजार रुपये इतकी आहे. 

सवलतीची रक्कम 13 हजार रुपयांपासून सुरु होत आहे. मुख्य म्हणजे महिंद्रा एक्सयूवी 700 किंवा महिंद्रा थारवर मात्र अशी कोणतीही ऑफर नाही. 

महिंद्रा मराजो आणि महिंद्रा अल्टुरस 
महिंद्रा मराजोवर 40,200 रुपयांची सवलत मिळत आहे. यामध्ये 20 हजार रुपयांपर्यंतची रोख सवलत आणि 15 हजार रुपयांता एक्सचेंड बोनस आणि 5200 रुपयांपर्यंतचं कॉर्पोरेट इंसेंटीव समाविष्ट आहे. 

महिंद्रा अल्टुर एसयुवीवर 81 हजार रुपयांपर्यंतची सवलत आहे. यामध्ये 50 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 11500 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि 20 हजार रुपयांच्या इतर ऑफर्सचा समावेश आहे. 

महिंद्रा एक्सयूवी300 आणि महिंद्रा एक्सयूवी100

महिंद्रा एक्सयूवी300 वर कंपनीकडून 69 हजार रुपयांची ऑफर देण्यात आली आहे. यामध्ये 30 हजार रुपयांपर्यंतचा कॅश रिवॉर्ड, 25 हजार रुपयांचं इंसेंटिव आणि 4.5 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट समाविष्ट आहे. 

महिंद्रा एक्सयूवी 100 एनएक्सटी वर एकूण 61055 रुपयांची सवलत देण्यात आली आहे. यामध्ये 38055 रुपयांचं कॅशबॅक, 20 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 3 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट यांचा समावेश आहे. 

महिंद्रा स्कॉर्पियो आणि महिंद्रा बोलेरो
महिंद्रा स्कॉर्पियो वर 29 हजार रुपयांच्या सवलती आहेत. यामध्ये 10 हजार रुपयांची रोख सवलत, 4 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट आणि 15 हजार रुपयांचे इतर फायदे यांचा समावेश आहे. 

तर, ऑफरोडिंग आणि हार्श ड्रायव्हिंगसाठी पसंती असणाऱ्या  महिंद्रा बोलेरोवर कंपनीनं 13 हजार रुपयांच्या सवलती दिल्या आहेत.

यामध्ये 10 हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस, 3 हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट समाविष्ट आहे. 

महिंद्राकडून देण्यात आलेल्या या घसघशीत आणि अविश्वसनीय सवलती पाहता, कार तुमच्या स्वप्नांतून दारापर्यंत येण्यास वेळ लागणार नाही असंच दिसतंय. 

Read More