Marathi News> भारत
Advertisement

काँग्रेस-बसपाच्या आघाडीला झटका, मायावतींनी उमेदवारांची यादी जाहीर केली

मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस-बसपा आघाडीला मोठा झटका बसला आहे. 

काँग्रेस-बसपाच्या आघाडीला झटका, मायावतींनी उमेदवारांची यादी जाहीर केली

नवी दिल्ली : मध्य प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेस-बसपा आघाडीला मोठा झटका बसला आहे. बसपाच्या प्रमुख मायावती यांनी गुरुवारी मध्य प्रदेशच्या २२ विधानसभा जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली. मायवती यांनी मध्य प्रदेशमधल्या भिंड, सबलगड, सिरमौर, अंबाह, सेवडा, करैरा आणि चंदला यांच्यासह २२ जागांसाठीच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांनी बसपासोबतच्या आघाडीबाबत अनेक वक्तव्य केली होती. पण मायावतींनी उमेदवारांची यादी जाहीर केल्यामुळे कमलनाथ यांच्या दाव्यांना सुरुंग लागला आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी देशभरामध्ये भाजपविरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून सुरू आहे. कर्नाटकमध्ये भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं जेडीएसला पाठिंबा देत कुमारस्वामी यांना मुख्यमंत्री बनवलं. अशाच प्रकारे देशभरात स्थानिक पक्षांशी युती करण्याचा काँग्रेसचा मानस आहे. पण मध्य प्रदेशमध्ये मात्र मायावतींनी काँग्रेसला धक्का दिला आहे. 

Read More