Marathi News> भारत
Advertisement

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर

मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली. 

मध्य प्रदेश पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसची उमेदवार यादी जाहीर

भोपाळ : मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची घोषणा केली. काँग्रेसने भाजपविरोधात १५ जागांवर उमेदवार उभे केले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रवींद्रसिंग तोमर, सत्य प्रकाश यांच्यासह १५ दिग्गजांच्या नावांना मान्यता दिली आहे. सोनिया यांचा ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली.

हे काँग्रेसचे उमेदवार 

- डिमणी विधानसभा मतदार संघातून रवींद्रसिंह तोमर 
- अंबाह विधानसभा मतदार संघातून सत्य प्रकाश
- गोहड विधानसभा मतदार संघातून मेवाराम जाटव
- ग्वॉलियरमधून सुनील शर्मा
 - डबरामधून सुरेश राजेला
- करैरा विधानसभा मतदार संघातून प्रागी लाल जाटव 
 - भांडारमधून फूल सिंह बरैया 
 - बमोरीमधून कन्हैया लाल
 - आशोक नगर मतदारसंघातून आसा दोहरे
 - अनुपपुरमधून विश्वनाथ
 - सांची मतदारसंघातून मदनलाल चौधरी
 - आगरमधून विपीन वानखेडे 
 - हातपिपलियामधून राजवीरसिंह बघेल  
- नपनगर विधानसभा मतदार संघातून राम किशन
 - सांवेरमधून प्रेमचंद गुड्डू

काँग्रेसच्या आधी बसपाने ८ जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले होते. बसपाने जौरा येथील माजी आमदार सोनाराम कुशवाह, मोरेना येथील रामप्रकाश राजौरिया, मेहगावचे योगेश मेघसिंह नरवारिया, गोहड येथील जसवंत पटवारी, पोहरीचे कैलाश कुशवाह यांना उमेदवारी दिली आहे. करेरामधून राजेंद्र जाटव यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे.

निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली

भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनीही विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजपने सदस्यत्व अभियान सातत्याने राबवित आहे. त्याचबरोबर, काँग्रेस देखील पुन्हा सत्ता मिळवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृतीवर भर देत आहे. तसेच काही योजनांवर काँग्रेस भर देत आहे. 

Read More