Marathi News> भारत
Advertisement

मध्य प्रदेशात भाजपचे सरकार तरणार, इतक्या जागा मिळणार?

मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीत (Madhya Pradesh By-Election) भाजपची (BJP) सरशी होताना दिसून येत आहे. याचे निकाल (Madhya Pradesh Election Results) जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे.

मध्य प्रदेशात भाजपचे सरकार तरणार, इतक्या जागा मिळणार?

मुंबई : मध्य प्रदेशात विधानसभा पोटनिवडणुकीत (Madhya Pradesh By-Election) भाजपची (BJP) सरशी होताना दिसून येत आहे. मध्य प्रदेशात २८ जागांसाठी पोटनिवडणूक झाली असून, याचे निकाल (Madhya Pradesh Election Results) जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची होती. मात्र, या भाजपने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसमधून (Congress) भाजपमध्ये दाखल झालेले ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या समर्थकांना विजय मिळताना दिसत आहे. दरम्यान, काँग्रेसला ८ जागा मिळताना दिसत आहे.

Live : बिहारमध्ये मोठी चुरस, पाहा सध्याची स्थिती

भाजपने १९ जागांवर आघाडी घेतली आहे. त्यामुळे भाजपला बहुमतासाठी ८ जागांची आवश्यता होती. ती पूर्ण होताना सध्या दिसून येत आहे.  त्यामुळे निकालात कोण बाजी मारणार, त्यावरून सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे. परंतु भाजपने आघाडी घेतली आहे. 

ज्योतिरादित्य सिंधिया यांची पत राहणार की जाणार?

कमलनाथ यांचे सरकार असताना भाजपने काँग्रेसचे आमदार फोडले होते. त्यामुळे अल्पमतात आलेले कमलनाथ यांचे सरकार कोसळले होते. याच काळात ज्योतिरादित्य सिंधिया यांनी समर्थक आमदारांसह भाजपत प्रवेश केला. पक्षांतरामुळे आमदारकी गेल्याने मध्य प्रदेशात पुन्हा निवडणूक (Madhya Pradesh Election Results) घेण्यात आली.

मध्य प्रदेशात २३० सदस्यीय विधानसभेत सध्या भाजपचे १०७ तर काँग्रेसचे ८७, बसपा २, सपा १ आणि ४ अपक्ष आमदार आहेत. बहुमतासाठी ११५ हा बहुमताचा आकडा आहे. भाजपला सत्ता टिकविण्यासाठी ८ आमदारांची गरज आहे. तर काँग्रेसला २८ जागांची गरज आहे. त्यामुळे मध्य प्रदेशात भाजपचे सरकार तरणार हे स्पष्ट झाले आहे.

Read More