Marathi News> भारत
Advertisement

पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या, चुलत्यासहीत तीन आरोपींना अटक

रात्रभर या चिमुरडीचा शोध तिच्या कुटुंबीयांकडून सुरू होता... परंतु, ती सापडली नाही

पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या, चुलत्यासहीत तीन आरोपींना अटक

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात अलिगढमध्ये अडीच वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर आता उज्जैनमध्येही एक धक्कादायक घटना उघडकीस आलीय. उज्जैनच्या महाकाल पोलीस स्टेशन अंतर्गात एका पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणाची नोंद झालीय. बलात्कारानंतर डोक्यावर विटेनं आणि काचेच्या बाटल्यांनी प्रहार करून या चिमुरडीची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह नदीमध्ये फेकून देण्यात आला. धक्कादायक म्हणजे, या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये चिमुरडीच्या चुलत्याचाही समावेश आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ६ जून रोजी घडली. ही चिमुरडी आपल्या वडिलांसोबत पहुडली होती. रात्री २ वाजता तिच्या आजीची झोपमोड झाली. यावेळी चिमुरडी जागेवर नव्हती. त्यानंतर रात्रभर या चिमुरडीचा शोध तिच्या कुटुंबीयांकडून सुरू होता. परंतु, ती सापडली नाही. 

त्यानंतर कुटुंबीयांनी सकाळीच पोलीस स्टेशन गाठलं. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चौकशी सुरू केली. याच दरम्यान मुलीचा मृतदेह क्षिप्रा नदीत सापडला. पोलिसांना सापडलेल्या चिमुरडीच्या मृतदेहावर एकही कपडा नव्हता तसंच संपूर्ण शरीर रक्तानं माखलेलं होतं. 

हे पाहून पोलिसांनाही धक्काच बसला. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत उज्जैन एसपींनी एसआयटी गठन केली... आणि तीन आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये एक आरोपी हा चिमुरडीचा चुलताच आहे. 

Read More