Marathi News> भारत
Advertisement

चंद्रग्रहण : ...हा खेळ सावल्यांचा!

अनेक जण ११ वाजल्यापासून आपली दुर्बीण सरसावून बसले होते

चंद्रग्रहण : ...हा खेळ सावल्यांचा!

मुंबई : शुक्रवार आणि शनिवारची मध्यरात्र खास होती. आकाशामध्ये सावल्यांचा खेळ रंगला होता. २१व्या शतकातलं सर्वात प्रदीर्घ कालावधीचं खग्रास चंद्रग्रहण अनुभवण्याची संधी मिळाली. चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद खगोलप्रेमींनी लुटला. अनेक जण ११ वाजल्यापासून आपली दुर्बीण सरसावून बसले होते. 

fallbacks

मध्यरात्रीपूर्वी ११ वाजून ५४ मिनिटांनी चंद्रानं पृथ्वीच्या सावलीत प्रवेश केला. मध्यरात्री १२ वाजून ५९ मिनिटांनी ग्रहणाची खग्रास स्थिती सुरू झाली २ वाजून ४३ मिनिटांनी खग्रास स्थिती सुटली, ग्रहणाचा एकूण कालावधी तब्बल ३ तास ५५ मिनिटांचा होता... आणि १ तास ४३ मिनिटं चंद्र पूर्णपणे पृथ्वीच्या सावलीमध्ये होता.

fallbacks

Read More