Marathi News> भारत
Advertisement

Loksabha Security Breach : संसद परिसरातून अटक करण्यात आलेला तरुण महाराष्ट्रातला

Loksabha Security Breach : लोकसभेच्या परिसरातून मोठी घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातल्या तरुणाने लोकसभेची सुरक्षा भेदत स्मोकिंग गनद्वारे गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी या तरुणासह एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

Loksabha Security Breach : संसद परिसरातून अटक करण्यात आलेला तरुण महाराष्ट्रातला

Loksabha Security Breach : संसद भवनावर झालेल्या हल्ल्याला 22 वर्षे पूर्ण होत असतानाच मोठी घटना समोर आली आहे. लोकसभा सुरु असताना प्रेक्षक गॅलरीतून दोन व्यक्ती लोकसभेच्या कामकाजात शिरले आणि बाकावर उभे राहिले. या दोघांनी स्मॉग गन पिवळ्या रंगाचा धूरही सोडल्याचे म्हटलं जात आहे. दुसरीकडे त्याआधी दोघांनी स्मॉग गनद्वारे रंगीत धूर सोडला होता. दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्यातील एक तरुण महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील असल्याची माहिती समोर आली आहे.

लोकसभा परिसरात असलेल्या परिवहन भवनासमोर स्मॉग गनमधून रंगीत धूर सोडून आंदोलन करणाऱ्या दोन आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये एका मुलीचा आणि महाराष्ट्रातल्या मुलाचा समावेश आहे. नीलम कौर सिंग रा. रेड स्क्वेअर मार्केट, हिस्सार आणि अमोल शिंदे रा. लातूर, महाराष्ट्र अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

लोकसभेच्या सुरक्षेत मोठी त्रुटी असल्याचे प्रकरण समोर आले आहे. संसदेचे कामकाज सुरू असताना प्रेक्षक गॅलरीतून दोन व्यक्तींनी सभागृहात उडी मारली. त्यांनी खासदारांच्या टेबल आणि खुर्च्यांवर चढून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी भाजप खासदार खगेन मुर्मू सभागृहाच्या टेबलवर आपली बाजू मांडत होते. तर अध्यक्षस्थानी राजेंद्र अग्रवाल होते. या दोघांना काही खासदारांनी पकडले आणि नंतर सुरक्षा दलांच्या ताब्यात दिले. एक व्यक्ती बाकावर चढला आणि घोषणाबाजी करू लागला. या घटनेने खळबळ उडाली आणि खासदार बाहेर पडू लागले. कामकाजही तातडीने तहकूब करण्यात आले. 

दरम्यान, याशिवाय संसद परिसराबाहेरही गोंधळ झाला. तिथे हरियाणाच्या एका महिलेने आणि महाराष्ट्रातील अमोल शिंदे या तरुणाने गोंधळ घातला होता. दोघेही हुकूमशाही चालणार नाही अशा घोषणा देत होते. संसदेबाहेर पकडलेल्या लोकांच्या हातात स्मॉग गन होत्या, ज्यातून पिवळा धूर निघत होता. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. या लोकांना आत जाण्याची परवानगी कशी मिळाली हा पहिला प्रश्न आहे. लोकसभेत उड्या मारणारे लोक आणि बाहेर गोंधळ घालणारे लोक यांचा काही संबंध आहे का? या प्रकरणाचाही शोध घेतला जाईल.

Read More