Marathi News> भारत
Advertisement

उरले फक्त काही तास! पुन्हा NDA ची सत्ता आल्यास सुस्साट कमाई करणार 'हे' शेअर

Loksabha Election 2024 : शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या अनुषंगानं तुम्हीही चांगल्या परताव्याची प्रतीक्षा करताय? निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा करा... कारण एनडीए जिंकल्यास...  

उरले फक्त काही तास! पुन्हा NDA ची सत्ता आल्यास सुस्साट कमाई करणार 'हे' शेअर

Loksabha Election 2024 : देशात सुरु असणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर काही तासांतच निवडणुकीचे निकाल हाती येणार आहेत. यंदाच्या निवडणुकीचा निकाल नेमका कोणाच्या बाजूनं लागणार याचीच उत्सुकता राजकीय पटलापासून उद्योगजगतापर्यंत पाहायला मिळत आहे, कारण सत्तेतील प्रत्येक बदलाचे परिणाम हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या देशाच्या अर्थव्यवस्थेवर आणि पर्यायी शेअर बाजारासह सामान्यांच्या पैशांवरही होताना दिसणार आहेत. (Loksabha election Results 2024)

सध्याच्या घडीला निवडणुकीच्या निकालासंदर्भात तज्ज्ञ मंडळी तर्कवितर्क लावत असतानाच शेयर मार्केट तज्ज्ञांनीही (Share Market Expert) त्यांच्या परिनं मोठी आर्थिक उलाढाल होणाऱ्या या क्षेत्राचं चित्र नेमकं कसं बदलेल याबाबतचे अंदाज व्यक्त केले. एका प्रतिष्ठीत वृत्तसमुहाला दिलेल्या माहितीनुसार अमनीश अग्रवाल यांनी एक महत्त्वपूर्ण अंदाज नोंदवला. जिथं त्यांनी देशात पुन्हा एकदा एनडीएचं सरकार आल्यास शेअर बाजारात नेमके कोणते बदल पाहायला मिळतील याबाबची सविस्तर माहिती दिली आहे. जिथं त्यांनी कोणत्या शेअरमध्ये उसळी पाहायला मिळू शकते आणि कोणते शेअर अपेक्षित परतावा देऊ शकतात यांची यादीसुद्धा दिली. 

कोणते शेअर करू शकतात चांगली कमाई? 

  • रिलायंस इंडस्ट्रीज (Reliance Industries)
  • स्टर्लिंग विल्सन (Sterling Wilson)
  • वारी रिन्यूएबल (Waaree)
  • एल एंड टी (L&T) 
  • प्राज इंडस्ट्रीज (Praj Industries)
  • मझगांव डॉक शिपबिल्डर्स (Mazgaon Dock)
  • कोचीन शिपयार्ड (Cochin Shipyards)
  • अल्ट्राटेक सीमेंट (UltraTech)
  • अंबुजा सीमेंट (Ambuja Cement)
  • रिलायंस इंडस्ट्रीज (Reliance Industries)
  • हिंदुस्तान एयरोनॉटिक्स (HAL)
  • भारत इलेक्ट्रॉनिक्स (BEL)
  • भारत डायनेमिक्स (Bharat Dynamics)
  • बीईएमएल (BEML) 

अग्रवाल यांच्या म्हणण्यानुसार लोकसभा निवडणुकीत एनडीला एकहाती सत्ता मिळाल्यास नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. भाजपच्या जाहीरनाम्यातच देशाच्या आर्थिक बाजूवर भर देणात आला आहे. ज्यामध्ये जागतिक स्तरावरील पायाभूत सुविधांसह तंत्रज्ञान क्षेत्राचाही उल्लेख पाहायला मिळाला. 

हेसुद्धा वाचा : Monsoon News : मान्सून म्हणजे काय? हा शब्द कधीपासून वापरला जातोय माहितीये? 

भाजपचा (BJP) एकंदर कल पाहता येत्या काळात शेअर बाजार महतत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आगामी वर्षांमध्ये सत्तेत येताच देशातील रस्ते, महामार्गांसह रेल्वे क्षेत्रातील विकास आणि इतर अनेक सुविधा देण्याकडे शासनाचा कल असेल. त्यामुळं अदानी पोर्ट्स (Adani Ports), लार्सन एंड टूब्रो (Larsen & Toubro), एबीबी (ABB) आणि सीमेंस (Siemens) यासह किर्लोस्कर न्यूमेटिक, ईएसएबी यांसारख्या स्टॉकना गुंतवणुकदार प्राधान्य देऊ शकतात. 

(शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमीचा विषय असून, कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More