Marathi News> भारत
Advertisement

'इथं' दडलीयेत मृत्यूची रहस्य! 7 व्या शतकातील रहस्यमयी मंदिरात पोहोचली कंगना; Photo पाहून विचाराल तिथं जायचं कसं?

जिथं विराजमान आहे साक्षात 'यम', कंगना रणौतनं हिमाचलमधील त्याच मंदिराला दिली भेट. प्रचारदौऱ्यादरम्यान कंगना नेमकी कोणत्या ठिकाणी पोहोचली? तुम्हालाही तिथं जायचंय?  

'इथं' दडलीयेत मृत्यूची रहस्य! 7 व्या शतकातील रहस्यमयी मंदिरात पोहोचली कंगना; Photo पाहून विचाराल तिथं जायचं कसं?

Loksabha Election 2024 Kangana Ranaut Visits Himachal Pradesh Temple : अभिनय क्षेत्रात सातत्यानं प्रस्थापितांच्या विरोधात उभी ठाकणारी अभिनेत्री कंगना रणौत आता राजकीय कारकिर्दीत व्यग्र दिसत आहे. अभिनय क्षेत्रात नावारुपास आल्यानंतर कंगना रणौतनं तिचा मोर्चा राजकारणाकडे वळवला आहे. मूळची हिमाचल प्रदेशातील कंगना इथूनच मंडी या मतदारसंघातून भाजपच्या वतीनं लोकसभेची निवडणूक लढणार आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर कंगनानं प्रसारसभा, प्रचार दौरे आणि भेटीगाठींचा धडाकाच लावला आहे. 

हिमाचल प्रदेशातील नागरिकांची भेट घेण्याव्यतिरिक्त कंगनानं इथं स्थानिक लोकप्रिय स्थळांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये हिमाचलमधील ऐतिहासिक मंदिरांचाही समावेश आहे. अशाच एका मंदिराला कंगनानं नुकतीच भेट दिली. चंबा येथील भरमौर भागात हे मंदिर उभं असून, त्याचं नाव आहे चौरासी मंदिर. कंगना यावेळी पारंपरिक हिमाचली वेशभूषेत दिसली. 

स्थानिक धारणांनुसार जवळपास 7 व्या शतकात उभारण्यात आलेल्या या मंदिरात साक्षात मृत्यूदेव, यम विराजमान आहेत असं सांगितलं जातं. चंबा भरमौर परिसरात जवळपास 84 मंदिरं असून, तिथंच यमाचंही एक मंदिर आहे. असं म्हणतात की, इथं यमदेव न्यायनिवाडा करतात. बाहेरुन पाहिल्यास हे मंदिर अतिसामान्य वाटतं. पण, त्यामागची कथा जाणताच हैराण व्हायला होतं. 

असं म्हणतात की, या मंदिराला चार वेगवेगळ्या धातूंची अदृश्य कवाडंही आहेत. स्थानिकांच्या मान्यतांनुसार सोनं, चांदी, तांबं आणि लोखंडापासून ही कवाडं तयार करण्यात आली आहेत. स्थानिकांची अशी मान्यता आहे की, व्यक्तीच्या मृत्यूनंतर यमदूत आत्मा इथंच यमाच्या दारी आणतात. जिथं त्या आत्म्याचं भवितव्य यमदेव निश्चित करतात. 

गरुड पुराणामध्येही या मंदिराचा संदर्भ असल्य़ाचं सांगितलं जातं. हिंदू मान्यतांनुसार भाऊबीजेच्या दिवशी या मंदिरात भाविकांची रीघ लागते. या दिवशी इथं मोठ्या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं. इतकंच नव्हे या पौराणिक आणि पुरातन मंदिरात यमाला भेटण्यासाठी साक्षात यमुना (नदी) या मंदिरापर्यंत येते अशीही धारणा आहे. 

हेसुद्धा वाचा : Mumbai News : काय म्हणता? रिसेप्शन सोहळा लग्नविधींचा भाग नाही; न्यायालयानं स्पष्टच सांगितलं 

पुराणकथांनुसार यम आणि यमुना सूर्यदेवाची अपत्य असल्याचं म्हटलं जात असल्यामुळं हिमाचल प्रदेशातील हे मंदिर अनेकांसाठीच कुतूहलाचा विषय आहे. जिथं, नुकतीच कंगनानं भेट देत सोशल मीडियावर या भेटीदरम्यानचे काही फोटोही शेअर केले. 

दरम्यान, सध्या कंगना हिमाचल प्रदेशातील विविध भागांना भेट देत असून, तिनं संपूर्ण लक्ष या राजकीय कारकिर्दीवर केंद्रीत केलं आहे. स्थानिकांशी संवाद साधत ती या मतदारसंघाला आणखी जवळून ओळखत स्थानिकांच्या समस्या जाणून घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे. 

Read More