Marathi News> भारत
Advertisement

युपीमधील २ तर बिहारमधील एक लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान

उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर दोन लोकसभेच्या दोन जागा आणि बिहारमधील अररिया या लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होते आहे.

युपीमधील २ तर बिहारमधील एक लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान

लखनऊ : उत्तर प्रदेशातील फुलपूर आणि गोरखपूर दोन लोकसभेच्या दोन जागा आणि बिहारमधील अररिया या लोकसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होते आहे.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याने गोरखपूरची जागा रिक्त झाली असून, उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्याने फुलपूरची जागा रिक्त झाली होती. या दोन्ही ठिकाणी आज मतदान होत आहे.

गोरखपूर आणि फुलपूरमध्ये बहुजन समाज पक्षाने समाजवादी पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला असून, काँग्रेस स्वबळावर लढत आहे. या निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, निमलष्करी दलाचे साडेसहा हजार जवान तैनात करण्यात आले आहेत. गोरखपूरमध्ये १०, तर फुलपूरमध्ये २२ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीची मतमोजणी १४ रोजी होणार आहे.

Read More