Marathi News> भारत
Advertisement
LIVE NOW

Tripura Meghalaya Nagaland Election Result Updates: भाजपा दिल्लीमधील कार्यालयात सेलिब्रेशन PM मोदींनी मानले मतदारांचे आभार

Tripura Nagaland Meghalaya Election Results 2023 LIVE Updates: मेघालय (Meghalaya), त्रिपुरा (Tripura) आणि नागालँड (Nagaland) विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. निवडणुकीचे निकाल (Election Results) हाती आले असून नागालँड आणि त्रिपुरामध्ये भाजपा यश मिळालं असून मेघालयमधील भाजपाच्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली आहे.

Tripura Meghalaya Nagaland Election Result Updates: भाजपा दिल्लीमधील कार्यालयात सेलिब्रेशन PM मोदींनी मानले मतदारांचे आभार
LIVE Blog

Tripura, Meghalaya & Nagaland Assembly Election Results 2023 Live Updates: ईशान्य भारतामधील मेघालय (Meghalaya Election Results), त्रिपुरा (Tripura Election Results) आणि नागालँडमधील (Nagaland Election Results) विधानसभा निवडणुकीचे निकाल आज (2 मार्च) जाहीर होत आहेत. या निकालाच्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स तुम्हाला 'झी 24 तास'वर पाहता येणार आहेत. मागील आठवड्यामध्ये या राज्यांमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर एक्झिट पोलमधून मांडण्यात आलेल्या अंदाजांनुसार त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपाचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

02 March 2023
19:25 PM

त्रिपुरा, नागालँड, मेघालय येथे भाजप एनडीए सरकार स्थापन होत आहे. नागालँडमध्ये रिपब्लिकन पक्षाने आमच्या पक्षाने 8 जागांवर निवडणूक लढवली, आम्ही 2 जागा जिंकल्या. आम्ही भाजपला पाठिंबा देऊ. मी 4 मार्चला जेपी नड्डा आणि अमित शहा यांची भेट घेणार आहे. आमचे 2 उमेदवार विजयी झाल्यास आम्हाला नागालँड सरकारमध्ये मंत्रीपद मिळावे, ही आमची मागणी आहे, असं रामदास आठवलेंनी नागालँडमधील विजयासंदर्भात म्हटलं आहे. नरेंद्र मोदींच्या कामामुळेच आम्ही निवडणुका जिंकल्या आहेत. महाराष्ट्रात आम्ही एक जागा जिंकलो आणि एक हरलो, निवडणुकांमध्ये विजय सुरूच असतो, असंही आठवलेंनी महाराष्ट्रातील निवडणुकीसंदर्भात म्हटलं.

18:31 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेघालय विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला मतदान करणाऱ्यांचे आभार मानले आहेत. एका ट्विटमध्ये मोदींनी, "आम्ही मेघालयला विकासाच्या वाटेवर घेऊन जाण्यासाठी मेहनत घेत राहू. राज्यातील लोकांना सशक्त बनवण्यासाठी आम्ही काम करु. मी माझ्या पक्षाचे कार्यकर्ते आणि त्यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांचे आभार मानतो," असं म्हटलं आहे.

17:11 PM

त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डबल इंजिन मॉडेलच्या धोरणाला भाजपाच्या यशाचं श्रेय दिलं आहे. भाजपाला अपेक्षेइतक्या जागा का नाही मिळाल्या असं विचारलं असता, "मी म्हणालो होतो की ही त्सुनामी असेल पण असं झालं नाही. यासाठी आम्हाला आत्मपरिक्षण करावं लागे. निवडणुकीच्या निकालानंतर आम्ही विश्वेषण करु तेव्हा आम्ही कुठे चुकलो आणि काय झालं हे तपासून पाहू," अशं म्हटलं. "राज्यात विकास करण्याला आणि येथील लोकांना शांतते जगता येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असू," असंही साहा म्हणाले.

16:02 PM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजपाचा जल्लोष सुरू, मेघालयमध्ये NPP आघाडीवर

ईशान्य भारतातील त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. त्रिपुरामध्ये भाजप पूर्ण बहुमताने पुन्हा सत्तेत येणार आहे. दुसरीकडे, नागालँडमध्ये, भाजपा आणि त्याचा सहकारी पक्ष नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (NDPP) बहुमताने सरकार स्थापन करताना दिसत आहे. याशिवाय, मुख्यमत्री कोनराड संगमा यांचा एनपीपी 27 जागा जिंकून मेघालयातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मात्र 60 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 31 जागा मिळतील का याबाबत थोडी शंका आहे. 

15:47 PM
15:38 PM
15:38 PM
15:37 PM

Meghalaya Chunav Result Live: मेघालयमध्ये कोनराड संगमा यांच्या निवासस्थानी 

मेघालयचे मुख्यमंत्री आणि नॅशनल पिपल्स पार्टीचे (एनपीपी) प्रमुख कोनराज संगना यांच्या निवासस्थानी सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 6 जागी त्यांचा पक्ष जिंकला असून 19 जागांवर आघाडीवर आहे.

15:33 PM
14:26 PM
13:49 PM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: नागालँडमध्ये महाराष्ट्रातील पक्षांना यश

नागालँडमध्ये महाराष्ट्रातील पक्षांनाही यश मिळालं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस 5 जागांवर आघाडी असून रिपाई आठवले गटाला दोन जागांवर विजय मिळाला आहे. 

टूएनसंद सदर- 2 विधानसभा मतदारसंघात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचे अधिकृत उमेदवार इम्तिचोबा हे विजयी झाले आहेत. तसंच नोकसेन विधानसभा मतदारसंघात वाय. लिमा ओनेन चँग हे विजयी झाले आहेत. नागालँडमध्ये ऊस शेतकरी या निवडणूक निशाणीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या उमेदवारांनी आठ जागी निवडणूक लढली आणि त्यात 2 उमेदवार विजयी झाले. अशी माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली. 

13:42 PM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: नागालँडला मिळाली पहिला महिला आमदार

नागालँडला पहिली महिला आमदार मिळाली आहे. राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीच्या हेकानी जाखलू यांनी 1536 मतांच्या फरकाने विजय मिळवत इतिहास रचला आहे. यासह त्या नागालँडमधील पहिल्या महिला आमदार बनल्या आहेत. नागालँडमध्ये यावर्षी एकूण चार महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. 

fallbacks

13:17 PM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: आठवले गटाने रचला इतिहास

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले गट) नागालँडमध्ये इतिहास रचला असून एक उमेदवार विजयी झाला आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) इम्तिचोबा तुएनसांग सदर-२ मधून ४०० मतांच्या फरकाने विजयी झाले आहेत.

दरम्यान नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीचे एस केओशु यिमचुंगर यांनी शामतोर चेसोर मतदारसंघात 2295 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. 

12:49 PM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: सुनीता चौधरी रामगढ विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर

AJSU उमेदवार सुनीता चौधरी रामगढ विधानसभा मतदारसंघातून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे महाआघाडीचे उमेदवार बजरंग महतो 11,000 हून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत. 

12:48 PM
12:47 PM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: NDPP 1 जागा जिंकून 22 जागांवर आघाडीवर तर भाजप 2 जागा जिंकून 11 जागांवर आघाडीवर

राष्ट्रवादी डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने 1 जागा जिंकून 22 जागांवर आघाडी तर भाजपने 2 जागा जिंकल्या आणि 11 जागांवर आघाडी घेतली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने एक जागा जिंकली असून एका जागेवर आघाडीवर आहे. 

12:46 PM
12:46 PM
12:44 PM
12:29 PM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: बोर्डोवलीतून मुख्यमंत्री माणिक साहा विजयी, तर मातरबारीमधून भाजपचे अभिषेक देबरॉय विजयी

त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत टाउन बोर्डोवली मतदारसंघातून मुख्यमंत्री माणिक साहा विजयी झाले. तर मातरबारी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार अभिषेक देबरॉय विजयी झाले आहेत. 2018 च्या त्रिपुरा विधानसभा निवडणुकीत भाजपचे बिप्लब कुमार घोष यांनी CPM च्या माधब चंद्र साहा यांचा 1569 च्या फरकाने म्हणजेच या जागेवर झालेल्या एकूण मतांच्या 3.36% मतांनी पराभव करून ही जागा जिंकली. 2018 मध्ये या जागेवर भाजपची मतांची टक्केवारी 49.47% होती.

11:52 AM
11:50 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: मेघालयात काँग्रेसची वाईट स्थिती, TMC भाजपाला देऊ शकतं धक्का; जाणून घ्या सत्तेचं समीकरण

Meghalaya Results 2023: मेघालायत (Meghalaya) सुरुवातीचे कल हाती आले आहेत त्यानुसार त्रिशंकू स्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान सुरुवातीच्या कलांमध्ये एनपीपी (NPP) 25 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. दुसरीकडे भाजपा (BJP) मात्र फक्त 6 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान तृणमूल काँग्रेसची (TMC) कामगिरी भाजपाची (BJP) चिंता वाढवणारी ठरु शकते. याच कारणास्तव आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा (Assam CM Hemant Biswa Sarma) यांनी मेघालयचे मुख्यमंत्री कोनराड संगमा (Meghalaya Chief Minister Conrad Sangma) यांची भेट घेतली होती. 

सविस्तर बातमीसाठी क्लिक करा

11:48 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: मेघालयात कॉनरॉड संगमा यांची NPP 26 जागांवर आघाडीवर

मेघालयातील चित्र आता स्पष्ट होताना दिसत आहे. कॉनरॅड संगमा यांची एनपीपी 26 जागी आघाडीवर आहे. दरम्यान काही स्थानिक पक्षांचा समावेश असणारे इतर 18 जागांवर आघाडीवर आहेत. टीएमसी आता फक्त 7 जागांवर आघाडीवर आहे. भाजपा आणि काँग्रेस प्रत्येकी 4 जागांवर आघाडीवर आहेत.

11:39 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: त्रिपुरात भाजपा पुन्हा सत्तेत येण्याच्या तयारीत

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, त्रिपुरामध्ये भाजपा पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी सज्ज झाली आहे. भाजपाने पक्षाने 60 जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा पार केला आहे. भाजपा 32 जागांवर आघाडीवर आहे. अद्याप मतमोजणी सुरू आहे.

11:21 AM
10:49 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: नागालँडमध्ये सत्ताधारी एनडीपीपी-भाजप युतीची सत्ता

नागालँड विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत NDPP-BJP युती 40 हून अधिक जागांवर पुढे आहे. तर NPF सहा जागांवर आघाडीवर आहे. तर एनडीपीपीने 40 जागांसाठी उमेदवार उभे आहेत. तर भाजपने 20 जागांसाठी उमेदवार उभे केले. तर, नागा पीपल्स फ्रंट (NPF) ने 22 जागांवर निवडणूक लढवली. 2003 पर्यंत राज्यात सत्ता गाजवणाऱ्या काँग्रेसने 23 जागांवर नशीब आजमावले. सध्याच्या विधानसभेत त्यांचा एकही सदस्य नाही. 

10:39 AM
10:31 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: मेघालयात चित्र पलटलं, कॉनरॉड संगमा यांचा NPP ठरतोय सर्वात मोठा पक्ष, TMC 8 जागांवर घसरली

मेघालयात आता फासे पलटताना दिसत आहेत. कॉनरॉड संगमा यांचा एनपीपी आता सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. ताज्या कलांनुसार एनपीपी 23 जागांवर आघाडीवर आहे. काही वेळापूर्वी किंगमेकरच्या भूमिकेत दिसणारी टीएमसी आता केवळ 8 जागांवर आघाडीवर आहे. इतर 16 जागांवर आघाडीवर आहेत. मेघालयमध्ये भाजपा आणि काँग्रेस प्रत्येकी 6 जागांवर पुढे आहेत.

10:24 AM
10:20 AM
10:15 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: मेघालयात कोणालाही स्पष्ट बहुमत नाही, त्रिशंकू स्थितीची शक्यता

मेघालय विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाही. एकूण 59 जागांच्या कलांमध्ये NPP 17 जागांवर तर TMC 13 जागांवर पुढे आहे. इतर 17 जागांवर आघाडीवर आहेत. भाजपा 5 जागांवर आघाडीवर आहे, तर काँग्रेसला 7 जागांवर आघाडी मिळाली आहे.

10:10 AM
10:04 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: नागालँडमध्ये BJP-NDPP युतीची दमदार कामगिरी, विरोधकांचा सुपडा साफ

नागालँडमध्ये नेफियू रिओ यांची नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी आणि भारतीय जनता पक्ष यांची युती क्लीन स्वीप देताना दिसत आहे. सर्व 60 जागांचे कल हाती आले आहेत, ज्यामध्ये भाजपा युती 49 जागांवर आघाडीवरआहे. तर एनपीएफ 6, एनपीपी 3 आणि काँग्रेस आणि इतर 1-1 जागांवर पुढे आहेत.

09:58 AM
09:54 AM
09:51 AM
09:48 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: ईशान्येतील 3 पैकी 2 राज्यात भाजपाचा बोलबाला

ईशान्येतील 3 पैकी 2 राज्यांमध्ये भाजपा विजयाकडे वाटचाल करत असल्याचं दिसत आहे. नागालँडमध्ये भाजपा 54 जागांवर आघाडीवर आहे. एनपीएफ आणि एनसीपी केवळ प्रत्येकी 2 जागांवर आघाडीवर आहेत. त्याचवेळी त्रिपुरामध्ये भाजपा बहुमताच्या जवळ पोहोचला आहे. भाजपा 30 जागांवर आघाडीवर आहे. दरम्यान मेघालयात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळताना दिसत नाही आहे. एनपीपी 25 जागांवर पुढे आहे. टीएमसी 11 जागांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.

09:42 AM
09:30 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: त्रिपुरात भाजपा पुन्हा सत्तेत येण्याची शक्यता

त्रिपुरामध्ये सरकार स्थापन करण्यासाठी कोणत्याही पक्षाला 31 जागांची आवश्यकता आहे. सुरुवातीच्या कलांनुसार भाजपा 39 जागांवर आघाडीवर आहे. भाजपा पुन्हा एकदा राज्यात सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. डावे तसंच काँग्रेसच्या आशा पुन्हा एकदा सत्ता काबीज करण्याचे स्वप्न भंग पावताना दिसत आहे.

09:22 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: त्रिपुरा आणि मेघालयात चुरशीची लढत, नागालँडमध्ये भाजपा युती क्लीन स्वीपच्या दिशेने

त्रिपुरा, मेघालय आणि नागालँडमधील सर्व जागांचे कल हाती आले आहेत. त्रिपुरातील 60 जागांच्या कलांमध्ये भाजप 26 जागांवर पुढे आहे. काँग्रेस-डावी आघाडी 22 जागांवर आघाडीवर आहे. टीएमपी 11 जागांवर, अपक्ष उमेदवार 1 जागेवर पुढे आहे. 

मेघालयातील स्पर्धा अधिकच रंजक बनली आहे. येथे मुकुल संगमा यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेसने चांगली कामगिरी केली आहे. मेघालयात टीएमसी 20 जागांवर आघाडीवर आहे. एनपीपी 12 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर 16 जागांवर आघाडीवर आहेत. भाजपा ५ जागांवर तर काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर आहे.

नागालँडमधील 60 जागांचे कल हाती आले असून भाजपा युती 52 जागांवर आघाडीवर आहे. एनपीएफ 5 जागांवर पुढे असून, काँग्रेस 1 आणि एनपीपी 2 जागांवर पुढे आहे. 

09:09 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: मेघालयात TMC किंगमेकरच्या दिशेने, त्रिपुरात त्रिशंकूची स्थिती, नागालँडमध्ये भाजपाला स्पष्ट आघाडी

मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांच्या निवडणुकीचे निकाल आज येत आहेत. पोस्टल बॅलेटनंतर आता ईव्हीएम मतांची मोजणी सुरू झाली आहे. मेघालयमध्ये एक रंजक स्पर्धा पाहायला मिळत आहे. येथे मुकुल संगमा यांच्या नेतृत्वाखाली तृणमूल काँग्रेस किंगमेकर होताना दिसत आहे. मेघालयातील 59 पैकी 55 जागांचे कल समोर आले आहेत. यामध्ये कॉनरॅड संगमा यांचा एनपीपी 17, टीएमसी 14, भाजपा आणि काँग्रेस 7 आणि इतर 9 जागांवर आघाडीवर आहेत. 

त्रिपुरामध्ये 60 पैकी 57 जागांचे कल समोर आले आहेत. यामध्ये काँग्रेस आणि डाव्या आघाडी 18 जागांवर, टीएमपी 11 जागांवर आघाडीवर आहेत. भाजपा 28 जागांवर आघाडीवर आहे.

नागालँडमधील परिस्थिती स्पष्ट आहे. येथील 60 पैकी 57 जागांचे कल समोर आले असून त्यात भाजपा 45 जागांवर आघाडीवर आहे. एनपीएफ फक्त 6 जागांवर पुढे आहे. काँग्रेस 2 जागांवर पुढे आहे.

08:41 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: नागालँडमध्ये भाजपाला बहुमत

नागालँडमधील सुरुवातीचे कल हाती आले असून भाजपाला बहुमत मिळालं आहे. भाजपा 34, एनपीएफ 2 आणि अन्य 3 जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान मेघालयात सुरुवातीच्या कलांमध्ये एनपीपी सर्वात पुढे आहेत. एनपीपी 23, टीएमसी 13, भाजपा 8, काँग्रेस 7 आणि अन्य 4 जागांवर आघाडीवर आहेत. 

08:38 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: मेघालयात NPP तर नागालँडमध्ये भाजपा आघाडीवर

मेघालयमधील सुरुवातीचे कल हाती आले असून एनपीपीने (National Peoples Party) इतर पक्षांना मागे टाकलं आहे. मेघालयात एनपीपी 23, टीएमसी 10, भाजपा 8, काँग्रेस 5 आणि अन्य 4 जागी आघाडीवर आहेत. दरम्यान नागालँडमध्ये सुरुवातीच्या कलानुसार भाजपाला आघाडी मिळाली आहे. भाजपा 17 आणि एनपीएफ 7 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस अद्यापर्यंत खातंच खोलू शकलेली नाही. 

08:29 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: एक्झिट पोलचे अंदाज काय आहेत?

एक्झिट पोलने त्रिपुरामध्ये थोड्याशा फरकाने भाजपाचा विजय होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान मेघालयमध्ये चुरशीची लढत होईल अशी शक्यता आहे. नागालँडमध्ये भाजपा आणि त्याचा भागीदार एनडीपीपी (नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी) सहज विजय मिळवेल असा एक्झिट पोलचा अंदाज आहे. 

08:23 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: मेघालयात NPP ला आघाडी

मेघालयातून सुरुवातीचे कल हाती आले असून त्यानुसार, एनपीपीने आघाडी घेतली आहे. एनपीपी 10, भाजपा 3, टीएमसी 5 आणि काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान नागालँडमध्ये भाजपा 4 जागांवर आघाडीवर आहे. 

08:10 AM

Meghalaya Nagaland Tripura Election 2023 Result Live Update: नागालँडमध्ये भाजपाने खातं उघडलं

नागालँडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. नागालँडमध्ये भाजपा एका जागेवर आघाडीवर आहे. 

दरम्यान अकुलुतो येथून भाजपा उमेदवार बिनविरोध निवडून आला आहे. भाजपा उमेदवार काजेतो किनिमी यांचा विजय झाला आहे. 

07:24 AM

Meghalaya, Nagaland Election 2023 Result Live Update : मेघालयमध्ये नॅशनल पीपल्स पार्टी या पक्षाला सर्वाधिक मतं मिळण्याचा अंदाज एक्झीट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. विधानसभेच्या एकूण 60 जागांपैकी 18 ते 24 जागांवर नॅशनल पीपल्स पार्टीला यश मिळू शकतं. तिन्ही राज्यांपैकी मेघालयमध्येच भाजपाला फारसं यश मिळणार नाही असा अंदाज आहे. 

07:21 AM

Meghalaya, Nagaland Election 2023 Result Live Update :  'झी 24 तास' च्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवरुन तुम्हाला या तिन्ही राज्यांमधील निवडणुकांचे क्षणोक्षणीचे अपडेट्स पाहता येतील. फेसबुकवरील अपडेट्स तसेच ट्विटरवरील अपडेट्स तुम्हाला @zee24taasnews या अकाऊंटवर पाहता येतील. त्याचप्रमाणे युट्यूबवरही तुम्हाला या निकालाचे लाईव्ह अपडेट्स आणि विश्लेषण पाहता येईल. 

Read More