Marathi News> भारत
Advertisement
LIVE NOW

Biparjoy Cyclone LIVE Updates : बिपरजॉय चक्रीवादळचा गुजरातच्या उत्तर किनारपट्टीला मोठा फटका

Cyclone Biparjoy LIVE Updates : बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होऊन गुजरातच्या कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 125 ते 135 किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यता आहे.  

Biparjoy Cyclone LIVE Updates : बिपरजॉय चक्रीवादळचा गुजरातच्या उत्तर किनारपट्टीला मोठा फटका
LIVE Blog

 सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीवर ऑरेंज अलर्ट जारी 

Cyclone Biparjoy LIVE Updates : अरबी समुद्रातलं चक्रीवादळ गुजरातकडे झेपावले आहे. सौराष्ट्र, कच्छमार्गे ते पाकिस्तानकडे चालले आहे. गुजरातच्या जाखाऊ बंदर भागात 15 जूनला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होऊन गुजरातच्या कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 125 ते 135 किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यता आहे. अरबी समुद्रात सुरु झाले चक्रीवादळ 'बिपरजॉय' 14 जून रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारपर्यंत गुजरातमधील जाखाऊ बंदराजवळील मांडवी ओलांडू शकते. त्याचप्रमाणे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराचीच्या पलीकडे प्रवेश करु शकते, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. 

13 June 2023
11:14 AM

गुजरात सरकारला सूचना, अलर्ट राहण्याचे केंद्राचे आदेश

Biporjoy Cyclone LIVE Updates :  गुजरातला बिपरजॉयमुळे हायअलर्ट देण्यात आलाय. चक्रीवादळाचा मोठा धोका सौराष्ट्र, कच्छला आहे. त्यामुळे तिथल्या तयारीचा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आढावा घेणार आहेत. आज दुपारी 3 वाजता केंद्रीय गृहमंत्री गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि 6 जिल्ह्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. राज्य सरकारला दिलेल्या सूचनांनुसार तयारी आहे का याचा आढावा ते घेतील.

11:02 AM

चक्रीवादळामुळे ताशी 150 किलोमीटर वेगाने वारे 
Biporjoy Cyclone LIVE Updates : बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातच्या द्वारकामधल्या समुद्राला उधाण आलंय. ताशी दीडशे किलोमीटर वेगाने वारे वाहतायत.. याच द्वारकामध्ये झी २४ तास पोहोचलंय.. तिथे नेमकी काय परिस्थिती आहे.. चक्रीवादळाचा किती फटका द्वारकाला बसू शकतो.

11:02 AM

 चक्रीवादळामुळे मुंबईत हाय अलर्ट 

Biporjoy Cyclone LIVE Updates :  बिपरजॉय चक्रीवादळामुळे मुंबईत हाय अलर्ट देण्यात आलाय. तेव्हा जुहू चौपाटीवरही पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आलीय. तसंच लाईफगार्डही तैनात करण्यात आलाय. हाय अलर्ट देण्यात आल्यानंतरही काही जण जुहू चौपाटीवर गेले होते. त्यात चौघे बुडाले तर दोघांना वाचवण्यात यश आलंय. त्यानंतर मग जुहू किना-यावर आता सुरक्षा वाढवण्यात आलीय.

10:54 AM

10 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी 

Biparjoy Cyclone LIVE Updates  : बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरातच्या 10 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. कच्छ आणि सौराष्ट्रमध्ये 10 किमीच्या परिसरातली गावं खाली करण्यात आली आहेत. कच्छमध्ये कलम 144 लावण्यात आलंय. तीन दिवसांपासून शाळा आणि कॉलेजेस बंद ठेवण्यात आलीयत.. चक्रीवादळामुळे दीडशे किमी प्रतीतास वेगाने वारे वाहणार आहेत. तर 14 ते 16 जूनदरम्यान अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तेव्हा केंद्र आणि राज्य सरकारही अलर्ट मोडवर आहे. गुजरातमध्ये एनडीआरएफच्या 12 टीम्स तैनात आहेत. कच्छ, पोरबंदर, जामनगर, द्वारका, गिर सोमनाथ, मोरबी आणि राजकोटमध्ये या टीम्स तैनात केल्यायत. तर केंद्राच्या तीन टीम्स राखीव ठेवण्यात आल्यायत.. भावनगर, राजकोट, अहमदाबाद आणि गांधीधाममध्ये इमरजन्सी कंट्रोल रूम तयार करण्यात आल्यायत.

09:11 AM

बिपरजॉय चक्रीवादळ पाहा कुठे आहे?

Biparjoy Cyclone Updates : मुंबई अरबी समुद्रातील चक्रीवादळ गुजरातकडे धडकले आहे. सौराष्ट्र, कच्छमार्गे ते पाकिस्तानकडे चालले आहे. गुजरातच्या जाखाऊ बंदर भागात 15 जूनला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. 125 ते 135 किमी वेगाने वारे वाहतील अशी शक्यता आहे. 

08:58 AM

बिपरजॉय वादळाचा धोका,15 जूनपर्यंत 67 रेल्वे गाड्या रद्द

Biparjoy Cyclone Updates : बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने चक्रीवादळाने धोका असलेल्या भागातील लांब पल्ल्याच्या  67 गाड्या पूर्णपणे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय हवामान विभागाने (IMD) सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळ अधिक तीव्र झाले आहे. या चक्रीवादळाचा फटका फक्त किनारीपट्टीलाच नाही तर वाहतूक व्यवस्थेलाही बसला आहे. गुजरातमधील 'बिपरजॉय' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पश्चिम रेल्वेने घेतला आहे.

 लांब पल्ल्याच्या 67 रेल्वे गाड्या 15 जूनपर्यंत रद्द

08:29 AM

रायगड जिल्ह्यात किनारपट्टी भागात सोसाट्याचे वारे
 
Biparjoy Cyclone LIVE Updates : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातकडे जातंय. मात्र कोकणात या चक्रीवादळामुळे निर्माण झालेल्या वाऱ्यांचा फटका बसतोय. रायगड जिल्ह्यात किनारपट्टी भागात सोसाट्याचे वादळी वारे वाहातायत. श्रीवर्धन तालुक्यात वादळी वा-यांमुळे काही घरांचं नुकसान झालंय. वाळवटी गावात वादळी वा-यांमुळे काही घरांची छपरं उडाली. 

08:06 AM

बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होणार

Cyclone Biparjoy LIVE Updates  : 'बिपरजॉय' चक्रीवादळामुळे गुजरात, मुंबई आणि केरळजवळील समुद्र परिसरात उंच लाटा उसळू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. सध्या अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वादळांचा जोर वाढत असून, त्यामुळे हजारो लोक प्रभावित होण्याची शक्यता आहे. 'बिपरजॉय' चक्रीवादळ 15 जूनच्या दुपारपर्यंत गुजरातमधील जाखाऊ बंदराजवळील मांडवी ओलांडू शकते. त्याचप्रमाणे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराचीच्या पलीकडे प्रवेश करु शकते, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे. बिपरजॉय चक्रीवादळ आणखी तीव्र होऊन गुजरातच्या कच्छमध्ये धडकण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) गुजरातमधील सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

08:03 AM

किनाऱ्यावरील लोकांचे स्थलांतर

Cyclone Biparjoy LIVE Updates : मुंबईत सोमवारी बिपरजॉय चक्रीवादळाच्या कच्छमध्ये धडकण्यापूर्वी, कुलाबा येथे समुद्रात मोठी भरती आली. IMD ने सोमवारी सकाळी चक्रीवादळ बिपरजॉयमुळे गुजरातसाठी 'ऑरेंज' अलर्ट जारी केला. "सौराष्ट्र आणि कच्छ किनारपट्टीसाठी चक्रीवादळ इशारा देण्यात आला आहे. चक्रीवादळाच्या सतर्कतेच्या दरम्यान, गुजरातच्या कच्छ येथील कांडला येथील दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सखल भागातील लोकांना तात्पुरत्या निवारा स्थानांमध्ये हलवण्यास सुरुवात केली आहे. दीनदयाल बंदर प्राधिकरणाचे जनसंपर्क अधिकारी ओम प्रकाश यांनी सांगितले की, सहा जहाजे बंदरातून निघाली असून आणखी 11 जहाजे रवाना होणार आहेत. बंदर अधिकारी आणि जहाज मालकांना देखील सतर्क राहण्यास सांगितले आहे.

Read More