Marathi News> भारत
Advertisement

भय्यू महाराजांवर इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराजांवर इंदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.

भय्यू महाराजांवर इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

इंदूर : अध्यात्मिक गुरू भैय्यू महाराजांवर इंदूरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. भैय्यू महाराजांचं पार्थिव इंदूरमधल्या सूर्योदय आश्रमात ठेवण्यात आलं होतं. सयाजी चौकातल्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आली. भैय्यू महाराजांनी मंगळवारी दुपारी पिस्तुलानं स्वत:च्या मस्तकात गोळी झाडून आत्महत्या केली. काल रात्रभर त्यांचं पार्थिव इंदूरच्या बॉम्बे रुग्णालयात ठेवण्यात आलं होतं. महाराजांच्या अंत्यसंस्कारासाठी विविध पक्षांचे राजकीय नेतेमंडळी उपस्थित आहेत. राज्यातूनही पंकजा मुंडे, अनिल देशमुख, चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते अंत्यसंस्कारांना उपस्थित होते. महाराजांच्या अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांसह भक्तपरिवारानेही मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

सुसाईड नोटची दुसरी बाजू उघड

भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर त्यांची सुसाईड नोट सापडली आहे. माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही. तणावातून आत्महत्या केल्याचं भैय्यू महाराजांनी या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. तर आता या सुसाईड नोटची दुसरी बाजू समोर आली आहे. त्यात त्यांनी सूर्योदय परिवार आणि त्यांच्या आश्रमाची सर्व जबाबदारी त्यांचा सेवक विनायककडे देण्यास सांगितले आहे.

या व्यक्तीकडे दिली जबाबदारी

माझ्या सर्व आश्रम व त्याच्या संबंधित गोष्टींचे सर्व व्यवहार हे माझा सेवक विनायककडे द्या. माझ्यानंतर तोच हे सर्व व्यवहार योग्य प्रकारे सांभाळू शकेल, असे भय्यूजी महाराज यांनी त्यांच्या सुसाईड नोटच्या दुसऱ्या पानावर लिहले आहे.

कौटुंबिक कलहाच्या चर्चेला उधाण

आत्महत्या ही कौटुंबिक कलहातून केल्याचे बोलले जात असताना आपले सर्व व्यवहार सेवकाकडे देऊन या चर्चेला आणखीनच तोंड फुटत आहे. भय्यू महाराजांनी सर्व व्यवहार कुटुंबाकडे सुपूर्त न करता सेवकाकडे देण्याचा निर्णय का घेतला? हा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Read More