Marathi News> भारत
Advertisement

लालूंच्या मुलांमध्ये 'यादवी', म्हणून तेजप्रताप नाराज?

लालू प्रसाद यादव यांच्या दोन मुलांमध्ये यादवी सुरु असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

लालूंच्या मुलांमध्ये 'यादवी', म्हणून तेजप्रताप नाराज?

पटणा : लालू प्रसाद यादवांच्या मुलांमध्ये सुरू असलेल्या यादवीवर अखेर माजी उपमुख्यमंत्री आणि लालूंचे छोटे सुपुत्र तेजस्वी यादव यांनी सारवासारव केलीय. मोठे बंधू तेज प्रताप नाराज नसून त्यांनी उलट २०१९ च्या निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना बळकट करण्याच्यादृष्टीनं आपल्याशी चर्चा केल्याचा दावा तेजस्वी यादव यांनी केला. तेजस्वीवर अत्यंत प्रेम असून तो आपला मार्गदर्शक असल्याचंही तेज प्रताप म्हटल्याचा दावा तेजस्वी यादवांनी केलाय. पक्षात मानाचं स्थान दिलं जात नसून निर्णय प्रक्रियेतून डावललं जात असल्याचा आरोप तेज प्रताप यादव यांनी काल केला होता. त्यामुळे लालूंच्या आरजेडीमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं पुढं आलं होतं. 

Read More