Marathi News> भारत
Advertisement

14 मर्डर करणारा आरोपी निवडणुक जिंकला; गुजरात मधील सर्वात धक्कादायक निकाल

गुजरात(Gujrat) मधील सर्वात धक्कादायक निकाल समोर आला आहे. 14 मर्डर करणारा आरोपी आणि गुजरातमधील लेडी डॉनचा मुलगा या निवडणुकीत विजयी झाला आहे. कांधल जाडेजा(Kandhal Jadeja) असं या विजयी उमेदवाराचे नाव आहे.  

14 मर्डर करणारा आरोपी निवडणुक जिंकला; गुजरात मधील सर्वात धक्कादायक निकाल

Gujarat Assembly Election 2022: संपूर्ण देशाचे लक्ष गुजरात विधानसभा निवडणूकीक (Gujarat Assembly Election) निकालाकडे लागले होते. 182 जागांपैकी तब्बल 150 पेक्षा जागांवर भाजप आघाडीवर आहे. गुजरात(Gujrat) मधील सर्वात धक्कादायक निकाल समोर आला आहे. 14 मर्डर करणारा आरोपी आणि गुजरातमधील लेडी डॉनचा मुलगा या निवडणुकीत विजयी झाला आहे. कांधल जाडेजा(Kandhal Jadeja) असं या विजयी उमेदवाराचे नाव आहे.  गुजरातमध्ये भाजपची विजयाची झंझावत सुरु असताना सपाने देखील लेक्षवेधी विजय मिळवला आहे. सपाच्या तिकिटावर कुतियाना मतदार संघातून निवडणुक लढवणाऱ्या कांधल जाडेजा यांनी दणदणीत विजय मिळला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार झेलीबेन मालदेभाई ओडेदरा यांचा कांधल जाडेजा यांनी पराभव केला आहे. 

या जागेवरआम आदमी पक्षाचे भीमाभाई दानाभाई मकवाना यांनी देखील निवडणुक लढवली होती. तर, काँग्रेसचे नाथाभाई भुराभाई यांना देखील पराभववाचा सामना करावा लागला आहे. कुतियाना मतदारसंघावर आधीपासूनच कांधल जडेजाच्या कुटुंबाचे वर्चस्व आहे. मागील निवडणूकीतही कांधल जडेजा यांनीच ही जागा जिंकली होती. मात्र, मागच्या वेळेस त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुक लढवली होती.

कांधल जडेजा लेडी डॉनचा मुलगा

कांधल जडेजा हा संतोष बेन यांचा मुलगा आहे. संतोष बेन गुजरातच्या लेडी डॉन म्हणून ओळखल्या जातात. संतोष बेन यांच्यावर राज्यातील विविध पोलीस ठाण्यात 500 हून अधिक गुन्हे दाखल आहेत. कांधल यांच्यावर हत्येच तब्बल 14 गुन्हे दाखल होते. 1999 मध्ये, संतोष बेन यांच्या जीवनावर आधारित गॉड मदर नावाचा एक चित्रपट देखील बनवला गेला होता

संतोष बेन राजकारणात कशा आल्या

गुन्हेगारी जगतात आपला दबदबा असणाऱ्या संतोष बेन राजकारणात देखील सक्रिय झाल्या. 1990 ते 1995 या काळात त्या कुतियाना मतदारसंघाच्या त्या आमदार होत्या. त्यांचा भाऊ कंधल जडेजा याने देखील 2012 मध्ये कुतियाना मतदारसंघातून पहिल्यांदा निवडणूक लढवली आणि जिंकली देखील. त्यानंतर 2017 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आणि जिंकली. मात्र, आता त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून सपामध्ये प्रवेश केला आहे.

 

Read More