Marathi News> भारत
Advertisement

फक्त भाषणांमधील स्वाभिमान काय कामाचा; कुमार विश्वास यांचा मोदींना टोला

जम्मू-काश्मीरमध्ये अपहरण केलेल्या ३ पोलिसांचे मृतदेह सापडले

फक्त भाषणांमधील स्वाभिमान काय कामाचा; कुमार विश्वास यांचा मोदींना टोला

 नवी दिल्ली: केवळ भाषणांमध्ये पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या वल्गना करणे म्हणजे स्वाभिमान नव्हे, असा टोला 'आप'चे नेते कुमार विश्वास यांनी मोदींना लगावला. काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलिसांचे अपहरण केले. आज या पोलिसांचे मृतदेह शोध पथकांना मिळाले. या पार्श्वभूमीवर कुमार विश्वास यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. 
  

  हे भाषणवीरांनो, प्रवचनकारांनो. संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्रीपर्यंत राष्ट्रवादाचे दुकान चालवणाऱ्या प्रसारमाध्यमांतील मोगलांनो. तुम्हाला काही लाज उरली आहे का? का ती पण पक्ष कार्यालयात गहाण ठेवली आहे? केवळ भाषणांमध्ये वल्गना करणे हा स्वाभिमान नव्हे. केकने बरबटलेल्या हातांनी शत्रूंचा नि:पात करता येत नाही, असे कुमार विश्वास यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. 
  
  जम्मू-काश्मीरमध्ये अपहरण केलेल्या ३ पोलिसांचे मृतदेह सापडलेत. शोपिया भागात हे मृतदेह सापडलेत. मृतांमध्ये दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांचा तसेच निसार अहमद या पोलीस शिपायाचा समावेश आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी रियाज नायकू या दहशतवाद्यानं काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमध्ये एका ऑडिओमधून पोलिसांना नोकरी सोडण्याची धमकी दिली होती. त्यानंतर गुरुवारी काश्मीरमधील चार पोलीस बेपत्ता झाले होते. या पोलिसांचे अपहरण केल्याचं उघड झालं असून त्यातील तिघांचे मृतदेह शोपिया येथे सापडलेत. यानंतर राज्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

Read More