Marathi News> भारत
Advertisement

जागतिक शांततेसाठी नवरात्रीत अनोखी तपस्या

गेल्या आठ दिवसांपासून ते एकाच जागी एकाच स्थितीत आहेत. 

जागतिक शांततेसाठी नवरात्रीत अनोखी तपस्या

नागौर : राजस्थानमधील नागौर जिल्ह्यातील डिडवाना शहर (Deedwana) आध्यात्मिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहराची आभानगरी म्हणूनही ओळख आहे. नवरात्रोत्सवादरम्यान येथे आलेल्या एका साधूची अनोखी तपस्या भाविकांच्या श्रद्धेचे केंद्रबिंदू ठरत आहे. हे साधू जागतिक शांती आणि जनकल्याणासाठी आठ दिवसांपासून तपस्येत तल्लीन आहेत.

डिडवानामधील नृसिंह मंदिरातील बागेत राहणारे तपस्वी चेतननाथ नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून जागतिक शांतता आणि जनकल्याणसाठी देवी मातेच्या भक्तीमध्ये लीन झाले आहेत. गेल्या आठ दिवसांपासून ते एकाच जागी एकाच स्थितीत आहेत. आठ दिवसांपासून त्यांनी कूसही बदलली नसल्याचे सांगितले जात आहे.

fallbacks

दररोजच्या जीवनातील नित्यकर्मदेखील त्यांनी त्यागले आहेत. अद्याप त्यांनी कोणत्याही प्रकारचे अन्न, पाणी घेतले नसल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे चेतननाथ यांच्या शरीराच्या आजू-बाजूला आणि पोटावर ज्वारीच्या लोंबी उगवल्या आहेत. त्यांच्या या अनोख्या तपस्येची संपूर्ण शहरात चर्चा आहे. स्थानिक नागरिक श्रद्धेपोटी तपस्वींच्या दर्शनासाठी येत आहेत.

  

Read More