Marathi News> भारत
Advertisement

बँकेत एफडी करा आणि गंभीर आजारांवर विमा मिळवा, या बँकेचा दावा

बँकेकडून 'FD हेल्थ' लॉन्च

बँकेत एफडी करा आणि गंभीर आजारांवर विमा मिळवा, या बँकेचा दावा

नवी दिल्ली : आयसीआयसीआय बँकने नवीन FD लॉन्च केली आहे. ग्राहकांना या FDचा दुहेरी फायदा मिळणार आहे. ही FD'FD हेल्थ' या नावाने लॉन्च करण्यात आली आहे. ही FD केल्यानंतर पहिल्या वर्षी मोफत विमा संरक्षण मिळणार आहे. याला रिन्ह्यूही केले जाऊ शकते. 

बँकेने दिलेल्या माहितीनुसार, १० वर्षांसाठी २ ते ३ लाख रुपयांच्या FDवर आयसीआयसीआय लोम्बार्डकडून,  गंभीर आजारांवर एक लाख रुपयांचा विमा मिळणार आहे. १८ ते ५० वयोगटातील लोक या FDसाठी पात्र असतील.

या 'FD हेल्थ'मध्ये कॅन्सर, फुफ्फसे, किडनी, लिव्हर, ब्रेन ट्यूमर, अल्जायमरसह ३३ गंभीर आजारांचा समावेश आहे. या आजारांच्या इलाजावर १ लाख रुपयांपर्यंतचा विमा मोफत मिळणार आहे.

आतापर्यंत अशाप्रकारच्या दुहेरी फायदा असणाऱ्या FD बाजारात नसल्याचे बँकेचे म्हणणे आहे. बँकेकडून ही सुविधा FD एक्स्ट्रा या रकान्यात उपलब्ध आहे. 

बँकेचे अधिकारी प्रणव मिश्रा यांनी, शेअर बाजारात सतत चढ-उतार असतो. अशा परिस्थितीत बँक आपल्या ग्राहकांसाठी दुहेरी लाभ असणारी सुरक्षित गुंतवणूक घेऊन आली असल्याचे सांगितले आहे.

'FD हेल्‍थ' ही पहिलीच अशी सुविधा आहे, जी सुरक्षित गुंतवणूकीसह ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचे प्रणव मिश्रा यांनी सांगितले.

टीप : संबंधित बँकेतून विस्तृत माहिती घेतल्यानंतरच गुंतवणूक करा

  

Read More